बपेरा आंतरराज्यीय सीमेवर पोलीस चौकी सुरु

0
8

तुमसर,दि.14: बहुप्रतीक्षीत असणाऱ्या बपेरा आंतरराज्यीय सिमेवर जिल्हा पोलीस विभागाने कायमस्वरुपी पोलीस चौकीच्या प्रस्तावाला मजुंरी दिली आहे. या पोलीस चौकीचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू यांचे हस्ते करण्यात आले आहे. या चौकीला गावे हस्तांतरीत होणार आहेत.
सिहोरा पोलीस ठाणेपासून बपेरा आंतरराज्यीय सिमा १८ किमी अंतरावर आहे. या सिमेवरुन जिल्ह्यात अवैध साहित्यांची आयात व निर्यात करण्यात येत आहे. यामुळे या सिमेवर कायमस्वरुपी पोलीस चौकी मंजुर करण्याची जुनी ओरड आहे. बपेरा आंतरराज्यांचे सिमेवर नेण्याने पोलीस चौकीचे प्रस्तावाला याआधी मंजुरी देण्यात आली आहे. पोलीस चौकीचे इमारत बांधकाम करण्यासाठी देवसर्रा गावाचे हद्दीत जागेची पाहणी करण्यात आली आहे. पोलीस विभागाने मध्यंतरी १० लाख रुपये खर्चाला मंजुरी दिली असल्याची चर्चा होती. या इमारत बांधकामाचे हस्तांतरण राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यात आले आहे. परंतु जागेचा वाद आणि निधीचा वानवा असल्याने पक्के इमारत बांधकाम सुरु करण्यात आले नाही. पोलीस चौकी इमारत जागेची वारंवार पाहणी करण्यात येत आहे. परंतु मुहूर्त सापडेना असे झाले आहे. दरवर्षी सिमेवर राहून चौकी तयार करण्यात येत आहे.
ही सेवा बजावितांना पोलीसांची वाताहत होत असल्याचे जिल्हा पोलीस विभागाने खाजगी घरात आंतरराज्यीय सीमेवर गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला पोलीस चौकीला मंजुरी दिली. बुधवारला जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांचे हस्ते पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले. आंतरराज्यीय सिमेलगत असणारे २० गावे या चौकीला हस्तांतरीत केली जाणार आहे.
सिहोºयात विविध विभागाचे शासकीय कार्यालय आहेत. या कार्यालयात कोट्यवधी रुपये खर्चून कर्मचाºयांचे वसाहत बांधकाम करण्यात आले आहे. परंतु पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचाºयांना वसाहत नाही. पोलीस ठाण्याचे हद्दीत जागा असतांना वसाहत बांधकामाची ओरड आहे. यामुळे पोलीसांची वास्तव्याची समस्या सुटणार आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी वसाहत बांधकाम मंजुर करण्याकरिता हालचालींना वेग देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
सिहोरा पोलीसठाण्याच्या प्रागंणात जातीय सलोखा आणि सद्भावना बैठकीचे आयोजन जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता शाहू यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, जिल्हा परिषद सभापती धनेंद्र तुरकर, मोहगावचे सरपंच उमेश कटरे, माजी सभापती कलाम शेख, पंचायत समिती सदस्य गाढवे, पोलीस निरिक्षक प्रमोद बानबेले, मसरके उपस्थित होते. संचालन राहुल डोंगरे यांनी तर, आभार प्रदर्शन प्रविण जाधव यांनी केले.