23.2 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ २३.९२ कि.मी. रस्त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

२३.९२ कि.मी. रस्त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

0
25

गोंदिया,दि.१९ : मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था गोंदिया अंतर्गत गोरेगाव तालुक्यातील प्रजिमा ८ ते पंचवटी ते बबई रस्ता ३.१६ किमी, चिल्हाटी ते गिधाडी रस्ता १.३९ किमी, बबई ते कवडीटोला गिधाडी रस्ता ४.५४ किमी, गिधाडी बाम्हणी चोपा रस्ता ४.२० किमी, चोपा मोहाडी ते बाम्हणी रस्ता २.१६ किमी, पलखेडा ते नवाटोला रस्ता २.४० किमी, महाजनटोला ते गोवारीटोला हौसीटोला रस्ता ४.१६ किमी, इजिमा ७१ हलबीटोला रस्ता १.९१ किमी, अशा एकूण २३.९२ किमी रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. या कामावर एकूण १३२३.२६ लक्ष रुपये खर्च अपेक्षीत आहे. यावेळी पालकमंत्री यांच्यासमवेत माजी आमदार हेमंत पटले, जि.प.समाजकल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे व तहसिलदार कल्याणकुमार डहाट उपस्थित होते.

blank