23.4 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ राका येथील १९ वर्षीय युवकाचा मृत्यू

राका येथील १९ वर्षीय युवकाचा मृत्यू

0
22

सडक अर्जुनी,दि,१९ः- तालुक्यातील राका गावातील  १९ वर्षीय युवक सुनील ओमप्रकाश लोथेचा मृत्यू झाल्याने कुटुबांबियांना धक्का बसला.गेल्या दोनदिवसापासून सुनिलला बरे वाटत नव्हते.त्यामुळे सौंदडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे व उलट्या थांबत नसल्याचे बघून सुनिलचे वडिल ओमप्रकाश लोथे यांनी रुग्णालयातून गोंडउमरी येथील खासगी रुग्णालयात नेत असतांना दुर्दैवी मृत्यू झाल्याचे प्रकरण आज घडले.तालु्क्यात रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत असून आरोग्य विभाग रोगावर नियत्रण मिळविण्यात कुठेतरी अपयशी होत असल्याचेच  दिसून येत आहे.

blank