नगर पंचायत सालेकसा तर्फे स्वच्छतेचा संदेश

0
30
सालेकसा(पराग कटरे)दि.03ः- महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या पूर्व संध्येला सालेकसा नगर पंचायतीच्यावतीने गावातील विविध चौकात पथनाट्यद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आले. गावात प्लास्टिक बंदीसोबतच भविष्यात प्लास्टिकचा वापर कमी करून प्लास्टिकला आपल्या जिवनातून बाहेर कसे काढावे याकरीता पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. आदर्श बहुउद्देशीय संस्था उमरखेडच्या कलापथकाने हे पथनाट्य सादर केले. सालेकसा नगरपंचायत मध्ये नव्याने विलीन झालेल्या आमगाव खुर्द परिसरात व्यावसायिक दृष्टीने प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. रोज या कचऱ्याची विल्हेवाट लावताना मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळून येतो. ह्या प्लास्टिकमुळे विविध आजार नागरिकांना होऊन घनकचरा व्यवस्थापन अवघड बाब होत चालली आहे . करीता नागरिकांनी आपल्या सवयीत बदल करून कमीत कमी प्लास्टिक वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.पथनाट्य बसस्थानक, वन विभाग चौक, सुभाष चौक, गांधी चौक, गडमाता चौक भागात सादर करण्यात आले.
फुटाना शाळेत महात्मा गांधी व पूर्व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
देवरी:–  जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा फुटाना येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व पूर्व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष उच्च श्रेणी मुख्याध्यापक यु. एम. बागडे होते.यावेळी केंद्रप्रमुख रमेश उईके,एन.जे.प्रधान पदवीधर शिक्षक, लक्ष्मीबाई पंधराम, सदस्य भास्कर मेश्राम, भैसाख उईके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी स्वच्छ भारत सुंदर भारत अंतर्गत शालेय परिसरात विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक यांनी साफसफाई केली.
कार्यक्रमासाठी शिक्षक के. एन. सलामे, व्ही. डब्लू. शहारे, शाळांनायक जयंत कुऱ्हाडे, विद्यार्थीनी प्रतिनिधी प्रतीक्षा शहारे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एन.सुखदेवे यांनी केले तर आभार विषय शिक्षक टी. टी. नेताम यांनी मानले.