रेल्वेचा टाॅवर उभारण्यास शेतकर्यांचा नकार,परिस्थिती तणावपुर्ण

0
12

गोरेगाव,दि.26ः-गोंदिया जवळील एमआयडीसी मुंडीपार येथून गोरेगाव रेल्वेस्थानकावर विजेचा पुरवठा करण्यासाठी रेल्वेच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या टाॅवरचा योग्य मोबदला जोपर्यंत दिला जात नाही तोपर्यंत टाॅवर उभारू न देण्याचा निर्णय पुरगाव,चिचगाव भागातील शेतकर्यांंनी घेतल्याने तणावाची स्थिती आज पुरगाव येथे निर्माण झाली आहे. रेल्वेप्रशासनाच्यावतीने पोलीसांना पाचारण करुन टाॅवर उभारण्यासाठी कंत्राटदारासोबत पोचल्यानंतर ज्या शेतकर्यांच्या शेतातून टाॅवर जात अाहे त्यांनी विरोध करण्यास सुरवात केली आहे.3 वर्षापासून सदर प्रश्न सुरु असून गेल्यावर्षी आमदार डाॅ.परिणय फुके यांच्या मध्यस्थीने शेतकर्यांना रेल्वेकडून योग्य मोबदला देण्यावर चर्चा झाली होती.परंतु चर्चेनुसार झालेला मोबदला न देता फक्त 35 हजाराचा चेक देऊन फसवित असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.चिचगाव येथील राजू रहागंडाले,गजेंद्र रहागंडाले,भिकाजी ठाकरे,पुरगाव येथील प्रल्हाद हरिणखेडे,डिगेंद्र रहागंडाले यांच्या शेतातून हे टाॅवर चालले असून सध्या घडीला या परिसरातील शेतामध्ये रेल्वेचा कंत्राटदार,पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी तळ ठोकून बसले आहेत.