नागरिकांनी प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ घ्यावे : उपसभापती उमेश पाटील

0
9
मोहाडी,(नितिन लिल्हारे)दि.26 : जास्तीत जास्त नागरीकांना प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ घेवुन सर्वांसाठी घरे हि पंतप्रधान नरेंद्र मोदींची संकल्पना पुर्ण करुया असे आवाहन मोहाडी पंचायत समितीचे उपसभापती उमेश पाटील यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे.पंचायत समितीत पंतप्रधान आवास योजनेत घरकुल मंजुर झालेल्या ग्रामसेवक व  लाभधारकांच्या बैठकीत बोलत होते. ज्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा पहिला टप्पा मिळालेला आहे,अशा लाभार्थ्यांनी बांधकाम न केल्यास त्यांच्यावर योग्य ते कार्यवाही करण्यात येईल असेही ते म्हणाले.
तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना आवाहन करताना उपसभापती उमेश पाटील म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन सर्वांसाठी घरे ही मोहिम देशात सर्वत्र सुरु आहे आपल्या पंचायत समितीने हि योजना राबविण्यासाठी वेग घेतला आहे. कोणीही बेघर राहु नये हा या योजने मागचा हेतू आहे. यासाठी सर्वांनी पंचायत समितीशी संपर्क साधुन याबाबत माहिती घ्यावी. तसेच याकामी लाभार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी अधिकाऱ्यांना व अभियंत्यानाही या बैठकीस बोलवण्यात आले होते. लाभार्थ्यांना आपल्या शंका व सुचना मांडण्याची संधी दिली. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.