२२ दुध उत्पादक सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरु

0
13
  • १५ दिवसांच्या आत आक्षेप, हरकती नोंदविण्याचे आवाहन

वाशिम, दि. २६ :  सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांच्या ५ जुलै २०१८ रोजीच्या पत्रानुसार दहा वर्षांवरील अवसायानात असलेल्या सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील वर्षांवरील अवसायानात असलेल्या २२ प्राथमिक दुध उत्पादक सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या संस्थांची नोंदणी रद्द करण्यापूर्वी संबंधित संस्थेच्या धनको व  ऋणको तसेच सभासदांकडून काही आक्षेप, हरकती असल्यास त्यांनी १५ दिवसांच्या आत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (पदुम) अकोला तथा संस्थेचे संबंधित अवसायक यांच्याकडे सादर कराव्यात. या कालावधीत हरकती प्राप्त न झाल्यास कोणास काहीही म्हणावयाचे नाही, असे गृहीत धरून संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येईल, असे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (पदुम) अकोला यांनी कळविले आहे.

नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरु झालेल्या संस्थांमध्ये वाशिम तालुक्यातील शेतकरी दुध उत्पादक सहकारी संस्था, म. शेलू (र. नं. १३५४), जयकिसान दुध उत्पादक सहकारी संस्था, म. तोंडगाव (र.नं. ७७८), जयलक्ष्मी दुध उत्पादक सहकारी संस्था म. वाळकी जहांगीर (र.नं. १३६०), हनुमान दुध उत्पादक सहकारी संस्था म. चिखली (र.नं. १४७०), गोपाल दुध उत्पादक सहकारी संस्था म. पिंपळगाव (र.नं. १३६१), कारंजा तालुक्यातील वसंत दुध उत्पादक सहकारी संस्था म. पसरणी (र.नं. १६६), वसंत दुध उत्पादक सहकारी संस्था, म. काळी कारंजा (र.नं. १८१), भारत दुध उत्पादक सहकारी संस्था म. कारंजा (र.नं.१२८), राणूमाता दुध उत्पादक सहकारी संस्था म. खेर्डा बु. (र.नं.६५५), बेंबळपाट दुध उत्पादक सहकारी संस्था म. अंबोडा (र.नं. १३२३), जयअंबे दुध उत्पादक सहकारी संस्था म. शेवती (र.नं. ६७०),  उस्मानिया दुध उत्पादक सहकारी संस्था म. पानबिरा (र.नं. १६०), मागासवर्गीय दुध उत्पादक सहकारी संस्था म. फुलउमरी (र.नं.१५७), मानोरा तालुक्यातील मानोरा दुध उत्पादक सहकारी संस्था म. मानोरा (र.नं. ३०२), मंगरूळपीर तालुक्यातील आदर्श दुध उत्पादक सहकारी संस्था म. कोळंबी (र.नं. ६६२), किसान दुध उत्पादक सहकारी संस्था म. आसेगाव (र.नं. ६६१), मालेगाव तालुक्यातील बालाजी दुध उत्पादक सहकारी संस्था म. राजुरा (र.नं. १४७३), सर्वादय दुध उत्पादक सहकारी संस्था म. किन्हीराजा (र.नं. १४७५), गोपाळकृष्ण दुध उत्पादक सहकारी संस्था म. जऊळका रेल्वे (र.नं. ७८१), रिसोड तालुक्यातील लिंगेश्वर दुध उत्पादक सहकारी संस्था म. लिंगापेन (र.नं. १४८८), संतोष दुध उत्पादक सहकारी संस्था म. किनखेडा (र.नं. १४८७) व श्रीकृष्ण दुध उत्पादक सहकारी संस्था म. वनोजा (र.नं. १३५५) या संस्थांचा समावेश आहे