महाप्रज्ञा बुद्ध विहारात लागले थंड पाण्याचे ‘फ्रिजर’

0
14

तिरोडा,दि.27ः-आमदार विजय रहांगडाले यांच्या स्थानिक विकासनिधीतून पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत तिरोडा येथील महाप्रज्ञा बुद्ध विहारात शुद्ध व थंड पाण्याचे फ्रिजर लावण्यात आले. त्याबद्दल महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीच्या वतीने आ. विजय रहांगडाले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तिरोडा शहरात बौद्ध धर्मियांची संख्या सर्वाधिक आहे. महाप्रज्ञा बुद्ध विहार हे शहरातील एकमेव विहार असून, या ठिकाणात स्पर्धा परीक्षेचे अभ्यास केंद्र चालविले जाते. अनेक विद्यार्थी विहारात अध्यापनासाठी येतात. शिवाय शहरातील नागरीकांची सुद्धा या ठिकाणात नेहमीच रेलचेल असते. विहारात अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसह विहाराला भेट देणार्‍या लोकांना शुद्ध व थंड पाणी मिळावे, असा उदात्त हेतु ठेवून आ. विजय रहांगडाले यांनी पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत त्यांच्या स्थानिक विकास निधीतून फ्रिजरची व्यवस्था केली. त्यांच्या या उपक्रमाबद्दल शहरातील बौद्ध बांधवात आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष अतुल गजभिये, उपाध्यक्ष प्रकाश गेडाम, सचिव के.के. वैद्ये, कोषाध्यक्ष आर.बी. नंदागवळी, पवन वासनिक यांनी आमदार विजय रहांगडाले यांची भेट घेवून त्यांचा पुष्पगुच्छ व अभिनंदन पत्र देवून सत्कार केला.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणात नगर पालिकेच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा पूर्णकृती पुतळा उभारण्यासह सभागृह व अध्ययन केंद्र तयार करण्याची मागणी याप्रसंगी समितीच्या पदाधिकार्‍यांनी आ. विजय रहांगडाले यांना केली. महाप्रज्ञा बुद्ध विहाराच्या या मागणीबद्दल तथा विहाराच्या विकासासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याची ग्वाही त्यांनी भेटीदरम्यान दिली.