नागरिकांची महावितरण कार्यालयावर धडक

0
13

अहेरी,दि.27ः- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून तालुक्यातील ग्राहकांना अतिरिक्त वीज दरवाढ करून बिल पाठविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त करीत आज राष्ट्रवादी कॉंग्रेस विद्यार्थी सेनेच्या पुढाकारात महावितरण कार्यालयावर धडक दिली.मागील अनेक महिन्यांपासून विजेचा वापर अत्यल्प प्रमाणात होत आहे. त्यातच विजेचा लपंडावही सुरू आहे. तरीही वीज बिल तेवढेच येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा याचा फटका सहन करावा लागत आहे. सर्वत्र शासकीय कामे ऑनलाईन प्रक्रियेतून करावी लागत असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अतिरिक्त वीज बिल देण्यात आलेल्या ग्राहकांचे दरवाढ कमी करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी राकॉं विद्यार्थी सेनेच्या पदाधिकार्‍यांनी सहाय्यक अभियंता संतोष सुरेंद्ररेड्डी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सदर समस्यांचे निराकरण येत्या सात दिवसाच्या आत पूर्ण न केल्यास महावितरण कंपनीविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी सेना व नगरिकांना दिला. निवेदन देताना विद्यार्थी प्रतिनिधी कैलास कोरेत, राकॉंचे शहराध्यक्ष इरफान शेख, विधानसभा प्रमुख लक्ष्मण येर्रावार, माजी सरपंच रेणुका कुळमेथे, मल्लेश गद्दलवार, राकेश कन्नाके, सुरज सल्लम, सुशिल आत्राम, योगेश कन्नाके, शशांक येदासलवार, महिला आघाडीच्या साक्षी मल्लेलवार, ज्योती मडावी, विमल नागीरवार, उषा गाजलवार, कल्पना पेंदोर, अश्‍विनी गेडाम, सोनी चेन्नूरवार, वर्षा येलमुले, शिला सेलोटे, मिना सोनुले, रेखा बोधनकर उपस्थित होते.