जिल्ह्यात २८ धान खरेदी केंद्रांना मंजुरी

0
54

गोंदिया,दि.27ः-शासन निर्णयानुसार गोंदिया जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ भंडारा यांनी प्रस्तावित केलेल्या देवरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत १५ व नवेगावबांधचे १३ अशा एकूण २८ हमीभाव धान खरेदी केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली असून शेतकर्‍यांनी आपला धान, धान खरेदी केंद्रांवरच हमी भावाने विकावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या धान खरेदी केंद्रावर साधारण धानाकरीता १७५0 रुपये व दर्जा धानाकरीता १,७७0 रुपये प्रती क्विंटल दर निश्‍चित करण्यात आलेला आहे. केंद्रशासनाने हंगाम २0१८-१९ करीता धानासाठी १७ टक्के आद्रतेचे प्रमाण निश्‍चित केले असून कोणत्याही परिस्थितीत नॉन एफएक्यू दर्जाचे धानाची खरेदी केली जाणार नाही. प्रत्येक गाव एका विशिष्ट खरेदी केंद्रास जोडले असून याबाबत जोडलेले गावांची यादी संबंधीत केंद्रावर उपलब्ध राहणार आहे. तसेच केंद्रावर आणलेले परंतू खरेदी न होवू शकलेले धान सांभाळण्याची जबाबदारी ही संबंधीत शेतकड्ढयांची राहणार असून शेतकर्‍यांकडील धान खरेदी करताना ऑनलाईन खरेदी पध्दत सुरू करण्यात आली आहे. याकरीता आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक व ल ७/१२ धान विक्रीस आणतांना आवश्यक राहणार आहे. जिल्ह्यात देवरी तालुक्यात सालेकसा, अंभोरा, देवरी, बोरगाव, परसोडी, मुरदोली, पिंडकेपार, लोहारा/देवरी, चिचेवाडा, घोनाडी, गणुटोला, घमडीटोला, चिचगड, डवकी, भरेर्गाव येथे हमीभाव धान खरेदी केंद्र सुरु करण्यास मंजुरी मिळाली असून अजुर्नी/मोर तालुक्यात गोठणगाव, बाराभाटी, केशोरी, ईळदा, सडक/अजुर्नी तालुक्यात कनेरी, चिखली, परसोडी, खजरी, डव्वा, कोहमारा, दल्ली, डोंगरगाव, कोयलारी अशा एकूण २८ धान खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरु करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकड्ढयांना आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा म्हणून शेतकड्ढयांनी धान, हमीभाव दराने केंद्रावरच विक्री करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकार्यांंनी केले आहे.