बोपेसरच्या उपसरपंचावर अविश्वास,तर चोरखमाराचे सरपंच अपात्र

0
26

तिरोडा,दि.27 : तालुक्यातील खोडगाव-बोपेसर गट ग्रामपंचायतीच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव पारित झाल्याने पायउतार व्हावे लागले. तर चोरखमारा येथील सरपंच अपात्र ठरल्याने तेेथील उपसरपंचाची सरपंचपदी वर्णी लागली आहे.सविस्तर असे की, तिरोडा पंचायत समितीअंतर्गत गटग्रामपंचायत खोडगाव-बोपेसर येथील उपसरपंच तिरुपती राणे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव पारित झाल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले. त्याचप्रमाणे चोरखमारा येथे पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच कांचना भीमराव रामटेके यांच्याविरोधात  कविता विनोद गजभिये यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे सरपंचाच्या पतीचे शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण असल्याने पद रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर अपर जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिलेल्या निर्णयानुसार सरपंच कांचना भीमराव रामटेके यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) (ज-३) अन्वये अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर पंचायत समिती खंडविकास अधिकारी तिरोडा यांच्या आदेशावरून उपसरपंच मधुकर दहीकर यांनी चोरखमारा ग्रामपंचायत सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. .