आ.रहागंडालेंच्या प्रयत्नाने सव्वातीन कोटीचे रस्ते होणार

0
11

गोरेगाव,दि.२९ः-तालुक्यातील रस्ते विकास व सौंदर्यीकरणावर भर देत आपल्या स्थानिक निधी व्यतिरिक्त रस्त्यांकडे लक्ष पुरवून आमदार विजय रहांगडाले यांनी पाठपुरावा करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून गोरेगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी ३ कोटी २२ लक्ष १५ हजार रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करवून घेतला आहे. या निधीतून गोरेगावातील रस्त्यांना झळाळी मिळणार आहे.
तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी क्षेत्राच्या विकासासाठी लक्ष पुरवून आहेत. शासनाकडे सतत पाठपुरावा करून विधानसभा क्षेत्रातील गावांचा विकास केला जात आहे. तिरोडा तालुका वैनगंगा नदीलगत असल्यामुळे धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्र.१ चे पाणी खैरबंधा जलाशयात सोडले पूर्णत्वास नेले व टप्पा क्र.२ चे पाणी बोदलकसा चोरखमारा जलाशयात सोडण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. गोरेगाव तालुक्यातील रस्त्यांच्या विकास व सौंदर्यीकरणावर भर देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानुरूप शासनाने ३ कोटी २२ लक्ष १५ हजार रूपयांच्या निधीला मंजूरी प्रदान केली आहे.
सदर निधीतून गोरेगाव तालुक्यातील सन २0१६-१७ मध्ये मोहगाव बोटे ७.२६ किमी रस्तयांकरीता २२७.३३ लक्ष, सन २0१६-१७ मध्ये हिरडामाली मोहगाव २.८९ किमी रस्ता १३१.२७ कि.मी, एसएम ३५ ते लेंडीटोला ८.४५ कि.मी ४२३.८६ लक्ष, एमडीआर कवलेवाडा – डव्वा ५.१0 किमी रस्त्यासाठी १९८.३१ लक्ष, सन २0१७-१८ मध्ये कवलेवाडा-ईसाटोला-शहारवानी २.९३ किमी रस्त्याकरीता १५0.८६ लक्ष, सोनी-नोनीटोला २.३२ किमी रस्त्याकरिता १७१.२९ लक्ष असे एकूण ३५ किमी रस्त्याकरिता ११ कोटी ७ लक्ष रूपयाचा निधी शासनाकडून पाठपुरावा करून आणण्यात आला आहे. मंजूर कामांमधून सोनी, नोनीटोला व शहारवानी, इसाटोला, कवलेवाडा रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जि.प.सदस्य पी.जी.कटरे, रोहिणीताई वरखडे, पं.स.सभापती माधुरीताई टेंभरे, प.स.सदस्य बबलु बिसेन, कृउबास संचालक ऋषीपाल टेंभरे, पं.स.सदस्य पुष्पराज जनबंधू, गोरेगाव न.प. उपसभापती सुरेश रहांगडाले, सरपंच उषा वलथरे, दिप्ती पटले, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दुर्गा ठाकरे, तालुकाध्यक्ष अनंत ठाकरे, साहेबराव कटरे, डॉ.मोहन ठाकरे, महामंत्री संजय बारेवार, बी.आर.गौतम, गुड्डू ठाकरे, विनोद पटले, शशीबाई फुंडे, अशोक पटले, कमलेश रहांगडाले, डी.बी.पटले, भोजू पटले, हनवत बोपचे, गुड्डू फुंडे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.