खासदार नेते यांचा जनता दरबार आज

0
23

सालेकसा,दि.२९ : तहसील कार्यालय सालेकसाच्या प्रांगणात खासदार अशोक नेते यांचा जनता दरबारचे आयोजन २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३0 वाजता करण्यात आले आहे. कार्यक्रमात ते नागरिकांचे समस्या व गार्‍हाणी ऐकून त्याचे निराकरण करणार आहेत. खासदार नेते यांच्या निदेर्शानुसार जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारात स्वस्त धान्य दुकान परवाना व किरकोळ केरोसीन परवाना धारकांनी आपल्या दुकानाच्या संपूर्ण माहितीसह उपस्थित रहावे, असे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.