झांजिया येथे युवकाच्या आधारकार्डवर महीलेचा फोटो

0
12

गोरेगाव,दि.29 : तालुक्यातील झांजिया येथील युवक निलेशकुमार अमृत बोपचे (वय ३२) यांच्या आधारकार्डवर महीलेचा फोटो व लिंग स्त्री लिहील्याने 7 वर्षापासुन  बँक खाते व शासकीय योजनेच्या लाभापासुन वंचीत राहावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.निलेशकुमार बोपचे यांनी एम. ए. बिएड चे शिक्षण घेतले असून भारत सरकार यांच्या आधारकार्ड शक्तीनुसार सन 23 एप्रिल 2011 ला आधारकार्ड तयार केले. या आधारकार्डवर नाव, जन्मतारीख, पत्ता, अंगठ्याचे ठस्से निलेशकुमार बोपचे यांचे असुन या आधारकार्डवर झांजिया येथील 60 वर्षीय महिला फुलनबाई गोवर्धन चौधरी यांचा फोटो आधारकार्ड सेतु केंद्र संचालक यांनी टाकल्याने बँक खाते व शासकीय योजनापासुन वंचीत राहावे लागत आहे.

निलेशकुमार अमृत बोपचे यांच्या आधारकार्डवरील महीलेचा फोटो हटविण्यासाठी 7 वर्षापासुन आधार केंद्र हेल्पलाईन क्रमांक 1947 वर संपर्क केला असता त्यांनी सांगीतल्याप्रमाणे निलेशकुमार बोपचे यांनी अनेकवेळा आधारकार्ड तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या आधारकार्डवरील महीलेचा फोटो हटविला नाही. त्यातच त्या महीलेचा 2 वर्षापुर्वी मूत्यु झाल्याची माहीती बोपचे यांनी दिली.आधारकार्डवरील महीलेच्या फोटोची माहीती देण्यासाठी  हेल्पलाईन लँडलाईन क्रमांक 02222163492 मुंबई या क्रमांकावर अनेकदा संपर्क केला. मात्र या क्रमांकावर संपर्क होवु शकला नाही त्यामुळे आधारकार्ड तयार करणाऱ्या केंद्राला ई-मेल अाय डी वर माहीती देण्यात आली पण यात सुधारणा न करता प्रक्रियेत असल्याचे बोलले जात असल्याने नवीन आधारकार्ड तयार करुन देण्याची मागणी निलेशकुमार अमृत बोपचे यांनी केली आहे.