25.1 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ भाजयुमोतर्फे समता दौड ३१ रोजी

भाजयुमोतर्फे समता दौड ३१ रोजी

0
27
गोंदिया ,दि.३०: सरदार वल्लभाई पटेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी ‘रन फॉर युनिटी’ समता दौडचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा गोंदियाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरूवात ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता मनोहर चौकातील शिवाजी स्मारक येथून करण्यात येणार आहेत. या समता दौडचे समापन वल्लभभाई पटेल चौकात करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पुरस्कार ५ हजार रूपये, व्दितीय  ३ हजार रूपये तर तृतीय पुरस्कार २ हजार रूपये देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येत सहभागी होण्याचे आवाहन भाजयुमोचे शहर अध्यक्ष नेत्रदिप (गोल्डी) गावंडे यांनी केले आहे.