अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांना सेवानिवृतीपर निरोप

0
13

गडचिरोली,दि.02ः- अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांचा नियत वयोमानानुसार सेवा नवृतीपर सत्कार कार्यक्रम बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे आयोजन महसूल कल्याण निधी अंतर्गत करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शेखर सिंह होते. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, सभागृहात अधिकारी, कर्मचारी वृंद उपस्थित होते.
यावेळी अशोक चौधरी यांचा शाल, श्रीफळ व भेट वस्तु व श्रीमती चौधरी यांना साळी-चोळी देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी आपल्या सेवाकाळातील संपूर्ण जिवनपट उलगडून नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी पर्यंतच्या संपूर्ण संघर्षमय प्रवासाबाबत सविस्तर विवेचन केले. मनोगत व्यक्त करताना शेवटी भावुक व सार्शूनयनांनी सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. निरोप समारंभास जिल्ह्यातील सर्वच विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार देवेन्द्र दहिकर, प्रास्ताविक महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, आभार धानोराचे तहसीलदार महेन्द्र गणविर यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन महसूल कल्याण निधी अंतर्गत करण्यात आले. यशस्वीतेसाठी ललीत लाडे, वनिश्याम येरमे, अनमदवार, सुनिल चडगुलवार, संजय चापले, निकुरे, नाना ठाकरे, कोल्टकर, मेश्राम यांनी सहकार्य केले.