अज्ञात इसमाने पळविलेली बस फसली

0
9

वाशिम,दि.03 : अकोला-२ या आगाराची एसटी महामंडळाची बस चोरण्याचा प्रयत्न अज्ञात इसमाने गुरुवारी रात्रीच्या सुमारास केला.तसेच आगारातून बस घेऊन निघालेला इसमाला महामार्गाच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामात बस पलटल्याने  ती तिथेच सोड़ून पलायन करावे लागल्याची घटना उघडकीस आली.
मंगरुळपीरनजिकच्या गोलवाडी येथे शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. अकोला-२ आगारात रात्री उभी असलेली एमएच-१४, ०६४२ क्रमांकाची एसटी बस अज्ञात चोरट्याने मंगरुळपीर येथे आणली. त्यानंतर ती वाशिमकडे नेण्याचा त्याचा प्रयत्न होता. मंगरुळपीर-वाशिम राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत गोलवाडीनजिक खोदकाम करण्यात आले आहे. याच ठिकाणाहून चोरट्याने वेगाने बस चालवत समोरच्या वाहनास ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला उलटली. त्यामुळे बस सोडून चोरट्याला पळ काढावा लागला.