प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचविण्याचे ध्येय-अा.अग्रवाल

0
9
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया दि.५ ;: रजेगाव-काटी व तेढवा- शिवनी उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांत सिंचनाची सुविधा पोहचली आहे. यातूनच मागील वर्षी दुष्काळी स्थितीतही चारगाव, सिरपूर व खातीया आदि गावांत पीक निघाले. भविष्यात तालुक्यातील नवेगाव-देवरी येथे उपसा सिंचन योजनेचे काम सुरू करून तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहचविण्याचे आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
५ कोटींच्या निधीतून मंजूर तालुक्यातील ग्राम पांजरा- लंबाटोला दरम्यान पांगोली नदीवरील बंधारा बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले यांनी, आमदार अग्रवाल यांनी क्षेत्रात सिंचनाच्या क्षेत्रात क्रांतीकारी व ऐतीहासीक कार्यक्रम केले असून शेतकरी लाभान्वीत झाले असल्याचे सांगीतले. जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी यांनी, आमदार अग्रवाल यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग लहान-लहान सिंचन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करीत असल्याचे सांगीतले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, विजय लोणारे, देवेंद्र मानकर, ओमप्रकाश भक्तवर्ती, मनिष मेश्राम, गेंदलाल शरणागत, अंकेश हरिणखेडे, आशिष चव्हाण, खेमनबाई बिरनवार, चेतनदास नागपुरे, रमन लिल्हारे, सत्यम बहेकार, हुकुम नागपुरे, टिकाराम भाजीपाले, दिनेश अग्रवाल, योगराम ठाकरे, दिलीप गिरी, महेश माहुले, रामरतन गणवीर, अनिल धुर्वे, निर्मला सवालाखे, कविता मेश्राम, लक्ष्मी लिल्हारे, डुलेश्वरी कापसे, रत्नमाला नागपुरे यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.