शॉर्टसर्किटने घर जळून ४ लाखांचे नुकसान

0
6

गोंदिया,दि.10-ःतालुक्यातील रावणवाडी येथील देवेंद्र रघुनाथ लिल्हारे यांच्या मालकीच्या घराला (दि.८) दुपारी १२.३0 वाजता सुमारास अचानक आग लागली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आगीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपयर्ंत घर जळून खाक झाले. या घटनेत ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
देवेंद्र रघुनाथ लिल्हारे यांच्या घराला आज दुपारी अचानक आग लागली. आगीचा भडका निदर्शनात येताच गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, उपस्थित गावकर्‍यांना आगीला आटोक्यात आणण्याचा सर्वकष प्रयत्न केला. तोपयर्ंत घराचे छत जळून खाक झाले. त्याचबरोबर घरातील जीवनोपयोगी साहित्यही जळून खाक झाले. या घटनेत जवळपास ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे लिल्हारे कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहे.