शेतकरी व बेरोजगार तरुणांच जिवन उद्ध्वस्त करणा-या सरकारला धडा शिकवा- मनोहर चंद्रिकापुरे

0
12

गोरेगाव,दि.10:-गोंदिया जिल्ह्यातील ४0% शेतक-यांचे अजुन पर्यंत कर्ज माफ झाले नाही. कर्ज माफ न झाल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळु शकले नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांना पिक विमा योजणेचा लाभ मिळाला नाही. अकाली पावसामुळे मागील हंगामात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांची नुकसान भरपाई मिळाली नाही. हि सरकार शेतकऱ्यांची नसुन उद्योजकांची असल्याचे प्रतिपादन भंडगा येथे आयोजित ” लाडाची लेक लाखात एक” या नाटकाचा उदघाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले. नाटकाचे उदघाटक शिक्षण विस्तार अधिकारी महेंद्र मोटघरे यांच्या हस्ते झाले.यावेळी डुमेश चौरागडे, इंजी.अविनाश बिसेन, लक्ष्मण चंद्रिकापुरे, शिवाजी ईश्वार, राकेश बघेले,सरपंच सोमेश रहांगडाले बबई, शारदा बाई सरपंच भंडगा,संजुबाई बडोले,रजनी दमाहे,एन.के. बघेले, खोमेश टेंभरे, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की राज्य सरकार ने जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा केला. परंतु प्रत्यक्षात कुठेही सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली नाही.युवकांना वर्षाला २ कोटी नौक-या देण्याचे आश्वासन देवुन सुद्धा आता पर्यंत फक्त ६ लक्ष युवकांना रोजगार निर्मिण करूण देण्यात आला. प्रत्यक्षात ८ कोटी नौक-या व रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे होता. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाणा वाढतच चालले आहे. देशाचे पंतप्रधान तरुणांना पकोडा तळुन उपजिका करा असा सल्ला देतात. शेतकरी आपल्या तरुण मुलांना शिक्षण देण्यासाठी जिवाचे रान करतात व त्यांच्या वृद्धपकाळात मदत होईल असे स्वप्न बघतात. पण नरेंद्र मोदी सुशिक्षित मुलांना बेरोजगार ठेवून त्यांचे संसार उध्वस्त करायला निघाले अशी टिका करीत विश्वासघातकी सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले. संचालन उमाकांत मोटघरे यांनी केले. आभार दिलिप खोब्रागडे यांनी म्हाणले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन शरणागत, भरत दमाहे, लालचंद खोब्रागडे, मिताराम कवास, भरत भोयर, राकेश मस्करे, गुन्नीलाल नंदेश्वर देवाजी मांढरे, राकेश मस्करे, सार्वजनिक माँ दुर्गा उत्सव नाट्य कला मंडळ भंडगा च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.