भाजप सरकारच्या कामांचे भूमिपूजन करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या लोकप्रतिनिधी पासून सावध रहा -विनोद अग्रवाल

0
13

ग्राम उमरी आणि उमरीटोला येथे चावडी बांधकामाचे भूमिपूजन

गोंदिया,दि.10ः- देशात मोदीजींचे सरकार आहे, राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून उत्कृष्ठ काम करत आहे. हे सरकार गरिबांसाठी सामान्य माणसांसाठी काम करत असून काँग्रेस ने जे ५० वर्षात केले नाही ते काम काम भाजप सरकार ने मागील ४ वर्षात करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप सरकारच्या योजना प्रत्यक्षात जनसामान्य लोकांपर्यंत पोचत आहे. परंतु भाजप सरकार ने केलेल्या कामांचा भूमिपूजन करून मीच हे काम केले अशा गवगवा करणाऱ्या खोटरड्या लोकप्रतिनिधी पासून जनतेने सावध राहावे असे प्रतिपादन  विनोद अग्रवाल यांनी केले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत गरिबांना घरे देण्याचे काम सरकार करत आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ज्यांच्या घरी शौचालय नाही त्यांना शौचालय बांधून देण्याचे कार्य सरकारने केले आहे. उज्जवला गॅस योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस वाटप मोठ्या प्रमाणात झाले असून आता ओबीसी, डढ, डउ अशा सर्वांना गॅस सिलेंडर देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. कर्जमाफीच्या माध्यमातून सामान्य शेतकऱयांना दिलासा देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. ओला वृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान असो किंवा दुष्काळामुळे झालेल्या शेतीची नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने भरीव मदत केली आहे. मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात पिण्याच्या शुद्ध पाण्याकरिता मोठया प्रमाणात गावागावात पिण्याच्या पाण्याच्या योजना शासनाने मंजूर केल्या आहेत. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मोठयप्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीची विकासाची व सूक्ष्म सिंचनाची कामे गावागावांमध्ये सुरू आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून साथींच्या रोगामध्ये फार मोठ्या प्रमाण कमतरता आली आहे. अशाप्रकारे सर्वसामाजातील माणसाकरिता मोदी सरकार आणि देवेंद्रजी यांचे सरकार काम करत असून सामान्य माणसांना दिलासा देण्याचे काम मोठ्या प्रमाणात भाजप सरकार ने केले आहे. परंतु भाजप सरकारच्या कामांचे भूमिपूजन करून भाजप चे काम दाखवा? म्हणणाऱ्या खोटरड्या लोकप्रतिनिधीनी त्यांचे शासन असतांना का काम करून दाखवलं नाही? असा सवाल विनोद अग्रवाल यांनी केला आहे.

मधदुष्काळ च्या वेळेस शेतकऱयांना आर्थिक मदत असो प्रत्येक बाजूने सरकार सामान्य लोकांना व समाजाच्या प्रत्येक घटकांना मदतच करत आहे. ५० वर्षात जितके आवास बांधून झाले नाही तितके आमच्या सरकारने २ वर्षातच केले. मोदीजींच्या स्वच्छ भारत योजने अंतर्गत शौचालय बांधण्यात आले त्यामुळे साथींच्या रोगांमुळे आजारी होणाऱ्यांची संख्या जी २४ हजारांवर होती ती या वर्षी फक्त २४ वर आली आहे.

आमदार गोपालदास अग्रवाल यांना अप्रत्यक्ष टोला लगावत ते म्हणाले कि काही लोकांना नुसतं भूमिपूजन करण्याचा आजार झाला आहे. त्यांना वाटत कि सगळं तेच करतात, जिथे पण जातात तिथे एकच गोष्ट सांगतात कि सगळे मी केलं सगळं मी केलं. पण सरकार आमचं योजना आमच्या मग तुम्ही कुठून काम केलं आणि इतकंच होत तर तुमचं सरकार असताना इतकं काम का नाही झाले ? असा खडा सवाल या वेळी विनोद अग्रवाल यांनी आमदार गोपालदास अग्रवाल यांना केला. अशा लोकांचा अहंकार संपवण्याचे आवाहन या वेळी विनोद अग्रवाल यांनी केले.
या वेळी पूर्व भाजप जिल्हाध्यक्ष  विनोद अग्रवाल, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, धनंजय तुरकर, ज्ञानचंद जमईवार, नरेंद्र तुरकर , लेखाबाई तुरकर , चेनेश्वर पटले, सुनील दाते, पुष्पां कोल्हे, दमणबाई मस्से, शारदाबाई मस्से, कैलास खोब्रागडे , मैनाबाई बागडे , राजेश पांढरे, बाबुलाल तुर्कार, भिवराम पटले, टेमेन्द्र तुरकर , ठाण सिंग तुरकर आणि गावकरी उपस्थित होते.