झिंगानूरच्या गावडे कुटुंबियांच्या मदतीला धावले माजी आमदार दिपक दादा आत्राम

0
14

आल्लापल्ली बसस्थानक जवळ झिंगानूर येथील वेल्ली गावडे हिचे दुःखदायक मृत्यू

आल्लापल्ली,दि.१५—…सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथील गणेश मल्ला गावडे यांचे पत्नी वेल्ली गणेश गावडे वय (30)ह्या काही दिवसांपासून आजार होत्या.तिच्यावर योग्य उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात तिला तिचे पती नेत असतांना तिची प्रकृती आल्लापल्ली बसस्थानकावर अधिकच बिघडली व उलट्या करून अचानक पणेजीव सोडली.या दुःखद घटनेची वार्ता वाऱ्यासारखी आल्लापल्ली परिसरात पोहोचली.
या घटनेची माहिती माजी आमदार दिपक दादा आत्राम यांना मिळताच स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसह आल्लापल्ली बसस्थानकात दुचाकीने जाऊन गावडे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी मुतुक महिलेच्या मृतदेह झिंगानूर ला नेण्यासाठी मृतक महिलेच्या पतीकडे पैसे हि नाहीत हे कळताच माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी स्वतः आल्लापल्ली येथील काळी पिवळी गाडी करून दिले.
विशेष म्हणजे मृतक महिलेची मृतदेह स्वतः माजी आमदाराने आल्लापल्ली येथील डॉ. सलुजा यांच्या दवाखान्यात मृतदेह उचलून नेले व दवाखान्यात डॉ. सलुजा यांनी मृत घोषित केल्यानंतर मृतक महिलेची मृतदेह काळी पिवळी गाडीत टाकन्याय आले.यावेळी आल्लापल्लीचे माजी सरपंच विजय कुसनाके ,माजी सरपंच दिलीप गंजीवार,जुलेख शेख,संदीप बडगे,सुधाकर कोरेत, वाहतुक विभागाचे  दुर्गे,महेश सडमेक,संदीप गेडाम सह कार्यकर्ते उपस्थित होते.