रस्ता म्हणजे शहर आणि गावाची नाळ-विनोद अग्रवाल

0
20

मोरवाही येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

गोंदिया,दि.१५ः तालुक्यातील मोरवाही येथे (दि.१४) भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश प्रतिनिधी विनोद अग्रवाल यांच्या अथक २५-१५ योजनेतून मंजूर अडीच लाख रुपयांच्या सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी बोलतांना गावासाठी आणखी निधी मंजूर करण्यात कसलीही कसर सोडणार नाही असे वचन अग्रवाल यांनी गावकऱ्यांना दिले. गावकऱ्यांच्या मागणीनुसार आणखी काम लवकरच मंजूर करवून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ता म्हणजे शहर आणि गावाला जोडणारी नाळ आणि तीच नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन अग्रवाल यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत रस्ते मंजूर करवून भाजप सरकारच्या कामाचे भूमिपूजन करून भाजपलाच प्रश्न विचारणाऱ्या लोकप्रतिनिधी पासून दूर आणि सावध राहण्याचे आवाहन केले. उज्ज्वला गॅस योजना, अटल विश्वकर्मा योजना आणखी बऱ्याच योजना भाजपच्या आणि सिलेंडर वाटप करून काही लोकप्रतिनिधी सरकारला विचारतात कि भाजपचे काम दाखवा हे हाश्यास्पद असल्याचे म्हणाले.यावेळी भाऊराव उके, ग्यानचंद भिमटे (सरपंच ),ग्रामसेवक सोनवाने, जितू हेमने, देवराव हेमने, प्रकाश शिवणकर, लक्ष्मण खोटेले, देवानंद शुक्ला , भुरू डोये, प्रह्लाद शिवणकर, शक्ती शिवणकर, युवराज पारधी, यंतनु पारधी, पप्पू पारधी, कारू डुंबरकांबळे, संजय डुंबरकांबळे, दिलीप मेश्राम, विजय मेश्राम, पवन हेमने , रमेश ठाकूर, विजय हेमने, संतोष हेमने, कैलास चौधरी आणि समस्त गावकरी बांधव उपस्थित होते.