शेतकèयांमुळे गोंदिया जिल्हा समृद्ध-आ.अग्रवाल

0
10

गोंदिया ,दि.१५: धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदियाची ओळख असून ही ओळख शेतकक्तयांमुळेच निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी सर्वांगिन दृष्टीने समृद्ध झाल्यास जिल्हा समृद्ध होईल. यासाठी सिंचन प्रकल्प तयार करुन शेतकèयांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवून त्यांचा सर्वांगिन विकास करण्याचे आपले ध्येय असल्याचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले. स्थानिक प्रताप लॉन येथे आयोजित दिवाळी मीलन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उभसभापती चमनलाल बिसेन, माजी सभापती स्रेहा गौतम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, गोंदिया-भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष पन्नालाल सहारे,अजीत गांधी, पृथ्वीपालसिंग गुलाटी, झामसिंग बघेले,अशोक लंजे, नामदेव किरसान, पी.जी.कटरे, डॉ.योगेंद्र भगत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, राजेश नंदागवळी, रत्नदीप दहीवले, अशोक चौधरी, पराग अग्रवाल, व्यकंट पाथरु, चुन्नीभाऊ बेंद्रे, धनलाल ठाकरे, अरुणकुमार दुबे, विठोबा लिल्हारे,आशिषसिंह नागपूरे, जगदीश अग्रवाल, खेमनबाई बिरनवार, सावलराम महारवाडे, आशिष चव्हान, प्रकाश रहमतकर, भागवत नाकाडे, डोमेंद्र रहांगडाले, दिलीप असाटी, शेषराव गिरेपुंजे, खेमराज साखरे उपस्थित होते.
आ.अग्रवाल म्हणाले, तालुक्यातील शेतकक्तयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी बाघ सिंचन प्रकल्पातंर्गत येणाक्तया ३०० कि.मी.नहराचे खोलीकरण व दुरूस्ती करण्यात आली. खमारी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले असून लवकरच १० नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
तालुक्यातील सर्व ६६ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये डॉक्टरांची नियुक्ती करुन नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे.रावणवाडी येथे ५ कोटी रुपयांच्या निधीतून नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात येणार आहे.
मागील वर्षी कामठा, नवरगाव, बटाना, खातीया येथे तयार करण्यात आलेल्या बंधाक्तयामुळे एक हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सोय झाली आहे. पांजरा-लंबाटोला दरम्यान ५ कोटी रुपयांच्या निधीतून बंधारा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर तालुक्यातील ३४ गावांचा समावेश जलयुक्त शिवार योजनेत करण्यात आला आहे. तालुक्यात सर्वत्र १५० कि.मी.लांबीचे रस्ते तयार करण्यात आले.
त्यामुळे नागरिकांची रस्त्यांची समस्या मार्गी लागली आहे. सीमा मडावी म्हणाल्या, जनतेला खोटी आश्वासने देवून केंद्र आणि राज्यात सत्तेवर आलेल्या सत्तारुढ सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत धडा शिकविण्याचे आवाहन केले. अंबुले म्हणाले सरकारने निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही.
केवळ मोठमोठ्या घोषणा करुन प्रत्यक्षात एकाही योजनेची अंमलबजावणी केली नाही. उलट जनतेला महागाई आणि दरवाढीची भेट दिली. त्यामुळे अशा विश्वासघातकी सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन त्यांनी केले. दिवाळी मिलन कार्यक्रमाला उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले.