सहस्त्रबाहू अर्जून यांची डाक तिकिट काढा

0
10

गोंदिया,दि.17ः-युवा कोसरे कलार समाज संस्था, गोंदिया जिल्हा (महा.) यांचे वतीने कलार समाजाचे आराध्य दैवत भगवान राज राजेश्वर कार्तवीर्य सहस्त्रबाहु अर्जून यांचेवर केंद्र शासनाने डाक टिकीट प्रकाशित करावे , या आशयाच्या मागणीचे निवेदन प्रधानमंत्री,मुख्यमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री यांना उपविभागीय अधिकारी गोंदिया यांच्यामार्फेत देण्यात आले.त्यापुर्वी कार्यालयात  आराध्य दैवत भगवान राज राजेश्वर कार्तवीर्य सहस्त्रबाहु अर्जून नमन करण्यात आले. निवेदन देणार्या शिष्टमंडळात संस्थेचे संस्थापक जिल्हा अध्यक्ष तिर्थराज उके, कोषाध्यक्ष दिनेश फरकुंडे, गोंदिया तालुका संघटक रघुनाथ मेश्राम, महेश मेश्राम, विक्की मेश्राम आदी संस्थेचे पदाधिकारी व समाजबंधु उपस्थित होते.