एएसकेएस सालेकसा ने केले विदर्भाचे प्रतिनिधित्व

0
6
सालेकसा,दि.19ः- दिल्ली येथे आयोजित जनजातीय मंत्रालयच्या भारतीय विपणन संघ आणि जनजातीय सहकारी विपणन विकास संघ मर्यादित, च्या विद्यमाने आयोजन राष्ट्रिय आदी महोत्सव दिनांक- 16 ते 31 नोव्हेंबर  2018 ला आयोजित करण्यात आले आहे. क्षेत्रिय कार्यालय मुंबई द्वारे  सालेकसा येथील एएसकेएस ह्या आदिवासी स्वयं कला संस्थान ने सहभागी होवुन  दिल्ली हाट नवी दिल्ली येथील राष्ट्रिय आदी महोत्सव (राष्ट्रिय जनजातीय महोत्सव ) मध्ये सहभागी झाले आहेत. संपूर्ण विदर्भातून हा मान  उईके शिल्पग्राम सालेकसा ह्याना मिळाला असल्याने परिसरात त्यांना कौतुक केला जात आहे. भारतातील सर्वदूर आदिवासी बांधवांची आणि  देश भरातील जनजातीतील कला लोकांपुढे यावी ह्या उद्देशाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येतो. ज्यात विविध विभागाचे आणि दुर्गम भागातील प्रतिनिधींना दालनाच्या माध्यमातून पाककला साजरी करण्याचा असतो. त्यात विदर्भाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उईके शिल्पग्राम ची निवड करण्यात आली आहे. उईके शिल्पग्राम येथील श्रीमती सुनीता मुन्नालाल उईके, प्रियंका मनोहर उईके, कुवरलाल संभु मडावी आणि संस्थेचे प्रतिनिधि मुन्नालाल ज्ञानिराम उईके हे सहभागी झाले आहेत.