भावना कदम यांची ‘स्वच्छता दूत’पदी नियुक्ती

0
108

गोंदिया,दि.21 : नगरपरिषद गोंदिया स्वच्छ सर्व्हेक्षण वर्ष २०१९ च्या अंतर्गत गोंदिया शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी नगरपरिषद क्षेत्राच्या अंतर्गत सर्व प्रभागातील नागरिकांसोबत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी नगरसेविका भावना दीपक कदम यांची स्वच्छता दूतपदी नियुक्ती केली आहे.भावना कदम यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांनी अध्यक्ष अशोक इंगळे, उपाध्यक्ष शिव शर्मा, मुख्याधिकारी चंदन पाटील, गटनेता घनश्याम पानतावणे, सभापती शकील मंसुरी, सभापती रत्नमाला शाहू, सभापती दीपक बोबडे, सभापती आशालता चौधरी, विमल मानकर, राजू कुथे, सतीश देशमुख यांचे आभार मानले. आपला प्रभाग सुंदर या संकल्पनेद्वारे प्रभाग क्र.६ मधील नागरिकांच्या सहयोगाने नगरसेविका भावना कदम या नेहमीच स्वच्छतेबाबत जागरूक राहतात. आता त्यांना संपूर्ण गोंदिया शहराचे स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केल्यामुळे त्यांनी आता आपले शहर सुंदर शहर ही संकल्पना साकार करण्यासाठी शासनानी दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्य करून या शहराला सुंदर बनविण्याच्या संकल्प भावना कदम यांनी घेतला आहे..