विदर्भवासीयांच्या भेटीला येताहेत ‘हनुमंता रिक्शावाला’

0
19

गोंदिया,दि.22ःःक्षेत्रातील व स्थानिक कलाकारांना घेऊन तसेच समाजातील विविध समस्यांना घेऊन एक आंदोलन उभे करण्यासाठी चित्रपटांची निर्मिती करता येते आणि याच उद्देशाला घेऊन गोंदियातील निर्माते विनोद जायस्वाल यांनी निर्देशक हामीद पटेल यांच्या सोबतीने अविरल बॅनर अंतर्गत निर्मीत ‘मी हनुमंता रिक्शावाला’ या चित्रपटाची निमीर्ती केली असून येत्या शुक्रवारी २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण विदभार्तील ३0 चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात गोंदियासह जवळच्या जिल्ह्यातील कलावंतांच्या मुख्य भूमिका असून चित्रपटाच्या माध्यमातून हनुमंता रिक्शावाला विदर्भवासियांच्या भेटीला येत आहे.
चित्रपटाची लांचीग शुक्रवारी होत असल्याने मंगळवारी २0 नोव्हेंबर रोजी चित्रपटाचे निमार्ते विनोद जायस्वाल व निर्देशक हामीद पटेल यांनी स्थानिक निर्मल टॉकीजच्या सभागृहात पत्र परिषदेचे आयोजन करून चित्रपटासंबंधीची माहिती दिली. यावेळी चित्रपटात मुख्य भूमिका साकरणारे कलावंत चिरंजीव गडमवार, प्रियंका भोंडे, राजकुमार शेंडे, दिपक असाटी, पार्श्‍वगायिका नेहा हटवार, संगीतकार राजेश बिसेन उपस्थित होते.
यावेळी चित्रपटाचे निमार्ते विनोदकुमार जायस्वाल यांनी सांगितले की, चित्रपटाच्या माध्यमातून एक आंदोलनच छेडण्याचा आपला प्रयत्न असून विदर्भाच्या सामाजिक समस्यांना वाचा फोडण्याचा काम या चित्रपटातून करण्यात आला असल्याचे ते म्हणाले. यावेळी निर्देशक हामीद पटेल यांनी सांगितले की, त्यांनी वयाच्या २५ व्या वषार्पासून मुंबई येथील चित्रपट र्शृष्टीत काम केले असून या कालावधीत विदभार्तील एकही कलावंताला संधी देण्यात आली नसल्याचे दिसून आले. आपण विदभार्तील रहिवासी असल्याने ही एक खंत मनात टोचत होती. तेव्हा विदर्भातील कलावंताना चित्रपटात काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी नेहमीच आपली चित्रपट तयार करण्याची इच्छा राहिली. विनोदकुमार यांच्याशी भेटून चित्रपट निमीर्ती करण्याचे ठरले तेव्हा विदभार्तीलच कलावंत घेऊन विदभार्तीलच काही समस्यांना घेऊन हा चित्रपट साकार करण्यात आला असून चित्रपटात निर्देशका म्हणून काम करण्याची संधी मिळाली असल्याचे ते म्हणाले. प्रसंगी चित्रपटात भूमिका साकारणार्‍या कलावंतांनी चित्रपटातील काही प्रसंगाविषयीची माहिती दिली.
विशेष म्हणजे चित्रपटातील सर्वच कलावंत विदभार्तील असून हनुमंताची भुमीका साकारणारे चिरंजीव गडमवार हे मुळचे गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील रहवासी आहेत. तर गीताची भूमिका साकारणाड्ढया प्रियंका भोंडे या नागपूर जिल्ह्यातील सालवा गावच्या असून सहाय्यक कलावंत राजकुमार शेंडे हे मुळचे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील रहवासी आहेत. तर पंडीतच्या भूमीकेतील दिपक असाटी, पार्श्‍वगायिका नेहा हटवार व संगीतकार राजेश बिसेन हे गोंदियातीलच रहिवासी आहेत. चित्रपटाची शूटिंग ही गोंदियातील पांगडी जलाशय, नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, गोंदिया शहर यासह विदभार्तील काही निवडक गावांमध्ये करण्यात आली असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली.