तीन दिवसीय संविधान दिन महोत्सवाचे आयोजन

0
10

गोंदिया,दि.23 : संविधान महोत्सव समिती छोटा गोंदियाच्या वतीने २५, २६ व २७ डिसेंबर रोजी तीन दिवसीय संविधानदिन महोत्सवाचे आयोजन चावडी चौकात करण्यात आले आहे.२५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम,सायंकाळी ४ वाजता संविधानदिन, हिंदू कोड बिलवर चर्चासत्र होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपक घरडे हे करणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून वैशालीताई खोब्रागडे,ॲड.प्रज्ञाताई डोंगरे, समताताई गणवीर, सविताताई ऊके, कुंदाताई गाडकिने, कुंदाताई पंचबुद्धे, रमा वाय.बोरकर, ॲड.एकता गणवीर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ७ वाजता आदिवासी गोवारी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी पवन टेकाम, गोपाल उईके दीपक वाहने, रोशन कावळे उपस्थित राहणार आहेत. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता संविधान दिनाच्या मुख्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ९ वाजता वंदना, ११ वाजता सहयोग मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलतर्फे नि:शुल्क वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता कविसंमेलन होईल. २७ नोव्हेंबर रोजी महात्मा जोतिबा फुले स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ७ वाजता सप्तखंजिरीवादक कीर्तनकार संदीप पाल यांच्या समाजप्रबोधनाचे आयोजन करण्यात आले आहे..