क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचे आदर्श अंगीकारून समाज बांधवांनी प्रगतीची कास धारावी : विनोद अग्रवाल

0
16

गोंदिया,दि.२३ : इंग्रजांशीच्या क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांनी कोणत्याही आमिषाला व शक्तीबळाला बळी न पडता, एवढेच नव्हे तर जिवाची पर्वा न करता लढा दिला.त्यामुळेच त्यांना अत्यल्प वयात वीरगतीला प्राप्त व्हावे लागले. मात्र त्यांचा लढा या आधीही इतिहासात स्मरणीय ठरला आहे. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांनी भारतीय समाज व्यवस्थेसाठी मोठा संघर्ष केला. समाज बांधवांनी त्यांचे आदर्श अंगीकारून प्रगतीची कास धारावी असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.
चुटिया येथे आदिवासी समाज बांधवांच्या वतीने बिरसा मुंडा जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. . प. चे माजी सभापती श्रावण राणा हे होते. तर उद्घाटक म्हणून जि. . प. माजी उपाध्यक्ष तसेच भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष विनोद अग्रवाल व प्रमुख अतिथी म्हणून मोहन गौतम,उपेंद्रसिह टेंभरे,मोहन राणे, जयेंद्र वट्टी, मनोहर मरघाये ,महेंद्र मारघाये, रमेश नाईक , गुलाब राहांगडाले, भारत तुरकर , राजेश पटले, विनोद शरणागत , श्यामा संस्कार, धनसिंग मरस्कोल्हे, डॉ. गंगाराम पटले. राजू येल्सरे, रंगू येल्सरे , बाबू येल्सरे, पोलिस पाटील अनिल राऊत, मधू राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी विनोद अग्रवाल पुढे म्हणाले राज्य सरकार राज्यातील सर्व घटक आणि समाजातील नागरिकांच्या पाठीशी उभी आहे त्या अनुषंगाने अनेक योजना राबवीत आहे त्या योजनांचा लाभ प्रत्येक गरजूंपर्यंत पोचावा त्यासाठी आपलेही प्रयत्न सुरू आहेत. अनेक योजनांमध्ये थेट सहभागी होऊन नागरिकांना योजनांशी जोडण्याचे काम आपण केले आहे फळस्वरूप अनेक योजनांचा लाभ आजच्या घडीला गरजूंना घेता येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने अनेक उल्लेखनीय कामे केले आहेत परंतु विरोधी पक्षाचे नेते हे पचवून घेत नाहीत. अनेक कामांचे श्रेय लाटण्याचाही प्रयत्न होत आहे ही बाब सांगण्यासारखे नाही. म्हणून आता जनतेने खरा हितेशी कोण, कोणाच्या पाठीशी उभे राहावे या बाबींचा विचार करून आगामी काळात असे जनप्रतिनिधी निवडून द्यावे. असे मत व्यक्त केले. तत्पूर्वी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या छायाचित्राचे विधिवत पूजन कारणात आले.तसेच ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील तसेच परिसरातील शेकडोंच्या संख्येत नागरिक उपस्थित होते.