गोंदिया व भंडारा जिल्हा शल्यचिकित्सकांची बदली

0
13

गोंदिया,दि.२३ः-सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने महाराष्ट्र वैद्यकिय व आरोग्य सेवा गट अ संवर्गातील ४ जिल्हा शल्यचिकित्सकांच्या बदल्या २२ नोव्हेंबर रोजी केल्या.त्यामध्ये गोंदियाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांची बदली भंडारा जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून करण्यात आली आहे.तर भंडारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माधुरी थोरात यांची बदली विनंतीवर नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात वैद्यकिय अधिक्षक पदावर करण्यात आली आहे.कोल्हापूर जिल्ह्यतील पारगांव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.वसंत शंकर पाटील यांना गोंदिया जिल्हा शल्यचिकित्सकपदी विनंतीवर करण्यात आले आहे.उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे (पाटील)यांची बदली तिथेच जिल्हा शल्यचिकित्सक पदावर करण्यात आली आहे.