श्रेय लाटण्यापेक्षा कामाला महत्व : आमदार डॉ परिणय फुके

0
12

गोंदिया,दि.२३ः- गोंदिया विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामाचे श्रेय लाटण्याचा आजार जनप्रतिनिधींना जडला आहे.मात्र भारतीय जनता पक्षाचे सरकार हे श्रेयासाठी नव्हे तर कामाला महत्व देत असून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सापत्नभूमिका न ठेवका विकासात्मक भूमिका असल्याचे प्रतिपादन भंडारा-गोंदियाचे आमदार डॉ.परिणय फुके यांनी केले.ते तालुक्यातील निलज येथे २५-१५ योजनेंतर्गत आयोजित कामाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.गेल्या १५ वर्षापासून या मतदारसंघात विकास काम करणारे लोकप्रतिनिधी असतानाही मतदारसंघाचा विकास का झालेला नाही अशी टिका सुध्दा त्यांनी केली.तसेच १५ वर्षातले मागासले पण अवघ्या ४ वर्षात कमी करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला.
निलज येथे माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजन सोहळा पार पडली.यावेळी रिखिलाल बिसेन,अविनाश जुगनहाके,भुमेश तुरकर,सुरेंद्र वासनिक,भूमेश्वरी तुरकर,रिनाताई मडावी,उषाताई डहाट,सविताताई मेश्राम,लताताई कुसराम उपस्थित होते.विनोद अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील विकासात आमदार परिणय फुके यांचा सिंहाचा वाटा असून विकास कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा आणि निधि खेचून आणण्यासाठी आमदार फुके नेहमीच तत्पर असल्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाला भाऊलाल सिंगंधुपे,जियालाल हरिणखेडे,एच.एन.गाते,बालचंद हरिणखेडे,उमेश तुरकर,शिवकुमार हरिणखेडे,राहुल तुरकर,जियालाल पटले,निराम कारे,टेकचंद तुरकर,बानुदराव तुरकर,प्रकाश रहांगडाले,रुपचंद कारे,अशोक डोंगरे,कार्तिक सोनवणे, अनिरुद्धं गजभिये,वसंत रंगारीसह अन्य ग्रामवासी उपस्थित होते.