गोवर रुबेला लसीचे पहिले लाभार्थी निवासी उपजिल्हाधिकारीर्यांचे कुटुंब

0
10

गोंदिया,दि.28: गोवर रुबेला आजारापासून जनजागृती व लसीकरण मोहिमेची सूरुवात आपल्या कुटुंबापासून व्हावी अशा संदेश देऊन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आपल्या 15 वर्षाखालील दोन मुलींना रुबेला लसीकरणाचे टीके लावून नागरीकांना या मोहिमेचे लाभ घेण्याकरीता अभिप्रेरीत केले. नागरीकांच्या मनात या लसीकरणाबाबत काही शंका नसावी म्हणुन प्रामुख्याने उपस्थित राहून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबातील दोन मुलींना लसीकरणाचे लाभ देऊन रुबेला या आजारापासून दूर ठेवण्याचे संदेश दिला आहे.

9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांना रुबेला आजारापासून वाचविण्यासाठी लसीकरणाची गरज आहे, त्यामुळे जिल्हयात 15 वर्षाखालील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमाताई मडावी यांनी उद्घाटन प्रसंगी केले. जिल्हयात  27 नोव्हेंबर पासून राष्ट्रीय गोवर रुबेला लसीकरण मोहिमेची सूरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारंजा येथे करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे व प्रामुख्याने जि.प मुख्याधिकारी डॉ. राजा दयानिधी उपस्थित होते. तसेच या ठिकाणी समाज कल्याण सभापती  विश्वजीत डोंगरे, कृषी व पशु संवर्धन सभापती शैलजाताई सोनवाने, सरपंच कारंजा धनवंताबाई उपराडे, जागतीक आरोग्य संघाचे जिल्हा समन्वयक डॉ. एफ.ए. मेश्राम, लायंस क्लब गोंदियाचे प्रमोद गुळधे, प्रामुख्याने उपस्थित होते.