१ लाख १९ हजाल लाभाथ्र्यांना गोवर रुबेलाचे लसीकरण

0
11

गोंदिया,दि.०४ : जिल्ह्यात २७ नोव्हेंबर रोजी गोवर-रूबेला टिकाकरण अभियानाला सुरूवात करण्यात आली आहे. यात आरोग्य विभागाकडून ८८.२८ टक्के लसीकरण करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी वास्तवीक ३२.५० टक्केच लसीकरण झाले असल्याचे दिसते. आरोग्य विभागाकडून दैनंदिन उद्दिष्टपूर्ती होत नसल्याचे दिसत आहे.नियोजनाप्रमाणे ३ लाख ६५ हजार ९५८ मुलांना लसीकरणाचे उदिष्ठ ठेवण्यात आले आहे. या मोहिमेच्या उदिष्ठपुर्तीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी व त्यांची चमू काम करीत आहे.
२७ नोव्हेंबर रोजी पहिल्याच दिवशी ४२ हजार ५३९ मुलांचे लसीकरण करण्यात आले. २८ तारखेला १३ हजार ३६६, २९ तारखेला ३१ हजार ९८६, ३० तारखेला ८ हजार ५३८ तर १ डिसेंबरला २२ हजार ५०३ मुलांचे लसीकरण करण्यात आले असून लसीकरणाची टक्केवारी ८८.२८ एवढी झाली आहे.आरोग्य विभागाने केलेल्या नियोजनाप्रमाणे २७ तारखेला ४९ हजार ८७४, २८ तारखेला १४ हजार ९६०,२९ तारखेला ३४ हजार ८९६, ३० तारखेला ९ हजार ८८६ तर १ डिसेंबरला २५ हजार १०२ मुलांना लसीकरण करण्याचे टार्गेट होते. मात्र यातील एकाही दिवशी लसीकरणाचे टार्गेट पूर्ण करण्यात आलेले नाही. जिल्ह्याला ३ लाख ६५ हजार ९५८ मुलांना लसीकरण करण्याचे टार्गेट आहे. यात सर्वाधीक ७८ हजार ६१९ मुले गोंदिया ग्रामीण व ४२ हजार ५१३ मुले गोंदिया शहरातील आहेत. तिरोडा ग्रामीण क्षेत्रात ४० हजार ३०८ तर शहरात ७ हजार २१२ मुलांचे टार्गेट आहे. गोरेगाव तालुक्यात ३४ हजार ९०९, आमगाव ३६ हजार ८५६, सालेकसा २४ हजार ५५६, देवरी ३२ हजार १६१, सडक-अर्जुनी ३१ हजार २६२ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३७ हजार ५६२ मुलांचे टिकाकरण करावयाचे आहे.लसीकरणामुळे जिल्ह्याच ७८ मुलांना बाधा झाली आहे. आरोग्य विभागाकडून याला मायनर, सेवर व सिरीयस अशा तीन गटातून बघितले जाते. यात ७४ मुले मानयर असून सेवरमध्ये १ तर ३ मुले सिरीयस गटात आहेत.