अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे विभाजन करा 

0
12
गोंदिया,दि.04:अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद गोंदिया जिल्हा शाखेच्यावतीने प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांचे नावे निवेदन सादर करून एकत्र असलेल्या अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला वेगवेगळे करण्याची मागणी करण्यात आली आहे.या संबंधीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले.निवेदनात भारत देश स्वतंत्र झाल्यापासूनच ग्राहकांच्या विषयांशी संबंधित अन्नधान्य पुरवठा विभाग व ग्राहक संरक्षण मंत्रालय संयुक्त आहेत. हे दोन्ही मंत्रालय भारतीय नागरिकांसाठी अति महत्त्वपूर्ण असून अन्नपुरवठा मंत्रालयाचे कार्य धान्यपुरवठा करणे व व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासोबत देखरेख करणे आहे.तर ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे कार्य न्याय व्यवस्था,ग्राहक संरक्षण कायदा १९८६ च्या अंतर्गत कार्य करणे आहे.हे दोन्ही काम वेगवेगळे असल्याने एकाचविभागामार्फत पाहिजे तसे न्याय दोन्ही विभागाला मिळत नाही,त्याकरिता दोन्ही विभागांना स्वतंत्र करण्याची मागणी करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष भुवन रिनायत,सचिव भाऊराव डोमले,उपाध्यक्ष चुन्निलाल बिसेन,प्रसिद्धिप्रमुख महेंद्र बिसेन,जगदीश बोपचे आदी उपस्थित होते.