ध्येय निश्चित केल्याशिवाय यश मिळणे अशक्य-पोलिस अधीक्षक बैजल

0
14
तिरोडा,दि.04 : पोलिस विभाग,अदानी फाउंडेशन तसेच ग्रामपंचायत खैरबोडीच्यावतीने पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन १ डिसेंबर ते २४ फेबु्रवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना  जिल्हा पोलिस अधीक्षक हरीश बैजल यांनी युवक व युवतींना जीवनामध्ये ध्येय निश्चिती केल्याशिवाय यश मिळणे अशक्य असल्याचा कानमंत्र दिला.तसेच फक्त पोलिस शिपाई होण्याचे स्वप्न न बघता पीएसआय,पीआय,आयपीएस या सारख्या पदाकरिता सुद्धा तयारी करण्याचा सल्ला दिला.अदानी फाउंडेशनने सुरू केलेल्या या उपक्रमाचा विद्याथ्र्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
अध्यक्षस्थानी अदानी पावर प्रमुख सी.पी. साहू हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये उपविभागीय पोलिस अधीक्षक नितीन यादव, अदानी फाउंडेशनचे नितीन शिराळकर उपस्थित होते.प्रास्ताविकात नितीन शिराळकर यांनी युवक व युवतीकरिता ३ महिने पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण मोफत देण्यात येईल असे सांगितले.
तसेच अध्यक्षीय भाषणात अदानी पावर प्रमुख सी.पी.साहू यांनी युवा शक्ती ही देशाची खरी संपत्ती आहे. आणि त्यामुळेच युवकांच्या उत्थानासाठी आम्ही कटिबद्ध असून अदानी फाउंडेशनच्या मार्फत असे कार्यक्रम नेहमी राबवीत राहू असे सांगितले. तसेच या संधीचा फायदा घेऊन जास्तीत-जास्त युवक-युवतींनी सैन्यात qकवा पोलिस विभागात भरती होऊन देशाची सेवा करावी अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन अदानी फाउंडेशनचे राहुल शेजव तर आभार अदानी पावरचे सिक्युरिटी विभाग प्रमुख पी. सूर्यकिरण यांनी मानले. कार्यक्रमाला ३०० पेक्षा जास्त युवक-युवती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोलिस विभाग, अदानी फाउंडेशन, सिक्युरिटी विभागांच्या कर्मचाèयांनी परिश्रम घेतले.