विनोद चौधरी यांना विदर्भ समाज गौरव पुरस्कार

0
17

गोंदिया,दि.05: विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटनेच्यावतीने येत्या ९ डिसेंबर रोजी आयोजित अधिवेशनात जिल्हा परिषदेचे सांख्यिकी विस्तार अधिकारी विनोद चौधरी यांना विदर्भ समाज गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे. चौधरी यांना जिल्हा परिषदेत उत्कृष्ठ सेवा दिल्याबद्दल २०१२ मध्ये शासनाच्यावतीने ही पुरस्कृत करण्यात आले आहे. विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष मिलींद मेश्राम यांनी चौधरी यांना सामाजिक कार्यासाठी पुरस्कार जाहिर केले आहे. चौधरी यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.