११ महिन्ङ्मापासून आसोली जि.प. क्षेत्र लोकप्रतिनिधीपासून वंचित

0
10

गोंदिया,दि.05: गोंदिया जिल्हा परिषदेच्या ५३ गटापैकी आसोली जिल्हा परिषद गटाचे सदस्य शेखर पटले यांचे जानेवारी २०१८ मध्ये आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाला ११ महिने पूर्ण झाले असून निवडणूक विभागाने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अद्यापही निवडणूक प्रक्रिया सुरु केलेली नाही.
लोकशाहीत एखादया लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास किंवा राजीनामा दिल्याच्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रिया अमलात आणणे आवश्यक असते. परंतु आसाोली जिल्हा परिषद गटाचे सदस्य यांच्या निधनाला वर्ष पूर्ण होत असताना त्या ठिकाणी निवडणूक न घेण्यामागचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. पटले यांच्या निधनामुळे जिल्हा परिषदेतील काँग्रेसची सदस्य संख्या एक कमी झालेली आहे. त्या आसोली जिल्हा परिषद क्षेत्राला गेल्या वर्षभरापासून लोकप्रतिनिधी नसल्याने जिल्हा परिषदेतील विविध विकासात्मक योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. जिल्हा परिषदेतील सत्ताधारी काँग़्रेस व भाजप ही दोन्ही पक्ष या पोटनिवडणुकीसंदर्भात मुग गिळून का बसले आहेत. तर पारदर्शक प्रशासनाचा कामकाज बघणाèया जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागातील अधिकाèयांनी याकडे जाणीवपूर्वक तर दुर्लक्ष केले नाही ना? असा प्रश्न ही उपस्थित झाला आहे.