स्वच्छ ग्राम स्पर्धेसाठी ग्रामपंचायतींमध्ये होणार चुरस !

0
22

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेंत प्रत्येक ग्रामपंचायत होणार सहभागी

*जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय ठरणार ग्रामपंचायतींचा क्रमांक ;प्रथम ग्रामपंचायतीला मिळणार 50 हजारांचे पारितोषिक

गाेंदिया,दि.07ः–स्वच्छ भारत मिशन अंर्तगत जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले असून डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सदर ग्रामपंचायतींच्या तपासणी पुर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वच्छ ग्राम स्पर्धेसाठी आता ग्रामपंचायतीमध्ये चुरस निर्माण झाल्याचे चित्र जिल्हयात पहावयास मिळत आहे.

स्वच्छ भारत मिशन अभियानाच्यावतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांर्तगंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे आयोजन 1 डिसेंबर 2018 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत करण्यात येत असून जिल्हयातील सर्व 545 ग्रामपंचायतींची तपासणी 31 डिसेंबरपूर्वी करण्यात येणार आहे. सदर ग्रामपंचायतींची तपासणी ही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हापरिषद क्षेत्रनिहाय समिती गठित करुन करण्यात येणार आहे. जिल्हयातील आमगाव तालुक्यातील 6 जिल्हा परिषद क्षेत्रातील 57 ग्रामपंचायती , अर्जुनी/मोर तालुक्यातील 7 जिल्हा परिषद क्षेत्रातील 70 ग्रामपंचायती, देवरी तालुक्यातील 5 जिल्हा परिषद क्षेत्रातील 57 ग्रामपंचायती,गोंदिया तालुक्यातील 14 जिल्हा परिषद क्षेत्रातील 109 ग्रामपंचायती,गोरेगाव तालुक्यातील 5 जिल्हा परिषद क्षेत्रातील 55 ग्रामपंचायती, सडक अर्जुनी तालुक्यातील 5 जिल्हा परिषद क्षेत्रातील 63 ग्रामपंचायती, सालेक सा तालुक्यातील 4 जिल्हा परिषद क्षेत्रातील 41 ग्रामपंचायती तर तिरोडा तालुक्यातील 7 जिल्हा परिषद क्षेत्रातील 95 ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद क्षेत्रातून प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला 50 हजारांचे पारितोषि मिळणार आहे. सदर ग्रामपंचायतींची तपासणी पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, परिसर स्वच्छता तसेच वैयक्तिक स्वच्छता या मुद्दयांच्या अनुषंगांने करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय ग्राम मपंचायत या स्पर्धेत सहभागी होत असल्याने स्वच्छ ग्राम स्पर्धेसाठी  चुरस निर्माण झाल्याचे चित्र जिल्हयात पहावयास मिळत आहे.