आदिवासी वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांनी काढली व्यसनमुक्त रॅली

0
6

चिचग़ड(सुभाष सोनवाने),दि.08ः- विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी तसेच खर्रा,गुटखा, तंबाखूपासून दूर ठेवणे आणि आपला समाज व्यसन व नशा मुक्त व्हावे ही सदभावना बाळगून चिचगड येथील शासकीय आदिवासी मुले आणि मुलीं वसतीगृहाचे गृहपाल के.बी. देशकर आणि कुमुद देशकर यांचे मार्गदर्शनात चिंचगड येथे व्यसन मुक्त अभियान रॅलीचे शुक्रवारला आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांची ही रॅली वस्तीगृहातून निघून गावभ्रमण करीत परत वसतीगृहात पोचली.यावेळी विद्यार्थ्यांनी बॅनर आणि पोस्टर्सच्या माध्यमांतून जनजागृती केली.
चिंचगड येथील मुख्य दुर्गा चौक येथे छत्रपती प्रतिष्ठान चिंचगडच्यावतीने वसतीगृहाच्या या स्तुत्य उपक्रमाची दखल घेत व्यसनमुक्त अभियानाला भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योगपती  श्यामसूंदर सावना होते.कार्यक्रमला प्रमुख मार्गदर्शक म्हणून  ककोडीचे प्राचार्य महेश रहांगडाले,संदीप कटकवार, ग्रा. प.सद्यस्य रियाज हमीद,पंकज कटकवार,निखिल झिंगरे हजर होते.यशस्वीतेसाठी  के.बी. देशकर, गृहपाल यांनी सर्वांचे आभार मानले.व्यसन मुक्ती अभियान साठी दोन्ही वस्तीगृहाचे गृहपाल, सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक मेहनत आणि सहकार्य केले