विद्यार्थ्यांनो तुम्हीच दिशा बदलवणारे खरे पाईक – मुबारक अली सैय्यद

0
9
समर्थ विद्यालय येथील ७८ वे स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन
लाखनी,दि.12ः-राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारे संचालित समर्थ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, लाखनी येथील ७८ वे स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आदर्श शिक्षक व माजी विद्यार्थी मुबारक अली सैय्यद, सुप्रसिद्ध कवी प्रमोदकुमार अणेराव, अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष आल्हाद भांडारकर, प्राचार्य दामोदर प्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. सोबतच संस्था सदस्य नारायण लाड, बाळासाहेब रणदिवे आणि शिवलाल रहांगडाले यांची उपस्थिती होती. सुप्रसिद्ध कवी प्रमोद अणेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर आपली छाप पाडली. आपल्या प्रमुख मार्गदर्शनात आलेले अनुभव सांगत मी आयुष्यात छोटे छोटे कार्य केले अनेक प्रतिकूल परिस्थितीतुन सामना करीत मोठे कार्य केले. विद्यार्थ्यांनो तुम्ही जबाबदार व्हा, तुम्ही सन्मानाने जगा कारण दिशा दर्शक हे तुम्हीच आहात. आपले गुरू हे सर्वात मोठे कारण आपण गुरूला देवास्थानी ठेवतो. जपान देशाचे आदर्श घ्यावे कारण जपान हा भौगोलिक दृष्ट्या विदर्भा एवढा देश आहे अनेक प्रतिकुल परिस्थितीतुन आणि संघर्षातून पुढे आलेला देश आहे. याचे कारण शोधले तर दोन कारण आपल्याला दिसतील एक म्हणजे देशभक्ती आणि दुसरे शिक्षणपद्धत हे होय. आपल्याला पुढे जायचे असेल तर शिक्षण पध्दती मध्ये बदल अपेक्षित आहे असे आपल्या प्रमुख मार्गदर्शनात मुबारक सैय्यद बोलत होते. १९५० पासून सुरू असलेल्या प्रसिध्द उदय हस्तलिखित वार्षिकांचे ६८ वे पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले, या उदय हस्तलिखिताचे संपादक निखाडे उपस्थित होते.
याप्रसंगी ताराराम हुमे, ममता खंडाईत या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. प्रदीप लिचडे यांच्या एन सी सी विभागात राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली याबाबत त्यांचे सत्कार करण्यात आले. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे यावेळी सत्कार करण्यात आले. यावेळी संयोजक शुधोदन नागदेवे, विजया घनमारे, विकास खेडीकर, सतीश भोवते, श्रीकृष्ण पटले, प्रशांत ढोमणे, बे तू आगाशे, प्रल्हाद सोनेवाने, देवराम चाचरे उपस्थित होते. याप्रसंगी संचालन विभावरी निखाडे तर आभार नागदेवे यांनी मानले.