वन्यजीव विभागाने पाडले प्राचीन तिर्थक्षेत्रातील शौचालय बांधकाम

0
19

गोरेगाव (जि. गोंदिया),दि.१९ : तालुक्यातील बोडुंदाला लागून असलेल्या आसलपाणी या गावच्या हद्दीत प्राचीन तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेकरिता संस्थेद्वारे शौचालय इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते.श्री शिवमंदिर व मारोती मंदिर ट्रस्ट पोंगेझरा( बोडुंदा) या संस्थेला जिल्हा स्तरीय वन हक्क समिती गोंदिया यांनी इतर पारंपारिक वननिवासी श्री शिवमंदिर मंदिर करिता आराजी १.०३ एक्टर पैकी जमीन दिले आहे.त्या जमिनीवर या शौचालयाची इमारत वन्यजीव विभागाने संस्थेला कोणतीही सूचना न देता बुधवारी (दि.१८) पाडली.विशेष म्हणजे या तिर्थस्थळातील प्रश्नांना घेऊन आमदार विजय रहागडांले यांनी जिल्हाधिकारी डॉ.कादबंरी बलकवडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतल्यानंतरही वन्यजीव विभागाच्या अधिकाèयांनी केलेली ही तोडफोड म्हणजे आमदार व जिल्हाधिकारी यांच्या अवमानच म्हणण्याची वेळ आली आहे.
श्री शिवमदिर व मारोती मंदिर ट्रस्ट पोंगेझरा (बोडुंदा) या संस्थेला जिल्हास्तरीय वनहक्क समिती गोंदिया यांनी इतर पारंपरिक वननिवासी श्री शिवमंदिर मंदिरकरिता जमीन दिली आहे. पोंगेझरा हे प्राचीन तीर्थक्षेत्र असून, यामध्ये महर्षी मेघा व महर्षी मुक्तानंद स्वामी यांचे आश्रम आहे. तसेच रामाजी महाराज, लुला महाराज, स्वामीम अनेकानंद यांची तपोभूमी आहे. त्यामुळे दरवर्षी वार्षिक कार्यक्रम, अभिषेक, महाशिवरात्रोत्सव, मकर संक्रांत असे कार्यक्रम ट्रस्टद्वारे करण्यात येतात. ही जमीन आलाबेदर रिठी यांच्याममध्ये १९१८/१९ रेकॉर्डप्रमाणे देवाजी कटरे जमिनदार यांच्या नावाने आहे. १९८९/९० बंदोबस्त रेकॉर्डप्रमाणे सर्वे क्रमाक ३ हिस्सा क्रमाक ४/५ मालक सरकार होते. पण महसुल विभागाने २०१३ मध्ये ही जागा कोणत्या नियमाप्रमाणे वन्यजिव विभागाला दिली. हे कळू शकले नाही. दरम्यान, शिवमंदिर व मारोती मंदिर ट्रस्ट बॉम्बे जरा यांनी नागरिकांच्या सुविधेकरिता शौचालय इमारत बांधकाम केले होते. या शौचालयाची तोडफोड सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांनी केली. उल्लेखनीय म्हणजे, २००२ मध्ये जिल्हाधिकारी यांनी ही जागा शिव मंदिर पोंगेझरा ट्रस्टला दिली आहे.याठिकाणी दरवर्षी मोठ्याप्रमाणात यात्रा भरत असल्याने भाविकांच्या सुविधेसाठी तीर्थक्षेत्र विकास निधीसह विविध निधीतून याठिकाणी काम करण्यात येत आहेत. वन्यजीव विभागाचे अधिकारी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना विनाकारण त्रास देत असल्याची माहिती सुरेंद्र बिसेन यानी दिली.या प्राचीन तीर्थ क्षेत्रातील कार्यक्रम साठी जिला परिषद, पंचायत समितीसह पोलीस स्टेशन गोरेगावलाही माहिती देण्यात आली आहे.आज बुधवारला मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी विजय राणे,सुरेंद्र बिसेन,जागेश्वर सुर्यवंशी,हेमराज सोनवाने यांच्यासह भाजप नेते रेखलाल टेंभरे यांनीही पोलीस ठाणे गाठले होते.