वैनगंगा कृषि महोत्सव दसरा मैदान येथे 22 ते 26 पर्यंत

0
9

भंडारा,दि.20:- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा भंडारा जिल्हयामध्ये कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने वैनगंगा कृषि महोत्सव व सरस महिला बचत गट विक्री प्रदर्शन 2018 चे आयोजन 22 ते 26 डिसेंबर 2018 या कालावधीत दसरा मैदान, शास्त्री वार्ड, भंडारा येथे करण्यात आले आहे.
या महोत्सवामध्ये कृषि निविष्ठा, खते, बियाणे विक्री, खाद्य पदार्थ, सेंद्रीय शेती उत्पादन, महिला बचत गटामार्फत निर्मित वस्तू, विविध गृहउपयोगी साहित्य, शेती पूरक उद्योग, शेती मशिनरी, सिंचन सुविधा, शेती अवजारे तसेच जीवनावश्यक वस्तुच्या उत्पादक व विक्रेत्यांना सुवर्ण संधी महोत्वामध्ये दालन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी दालन नोंदणी प्रकल्प संचालक आत्मा, भंडारा येथे सुरु करण्यात आलेली असून वैयक्तिक, गट कंपनी, संस्था करीता 2 हजार रुपये व शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी करीता 1 हजार रुपये सेवाशुल्क निर्धारित करण्यात आलेले आहे. स्टॉल नोंदणी करीता प्रत्येक तालुक्यातील तालुका, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक किंवा कार्यालय प्रकल्प संचालक आत्मा भंडारा दु. क्र. 07184-251266 यांचेशी संपर्क साधावा.
शासकीय योजना व बचत गटाचे स्टॉल आरक्षित असल्याने मोजक्याच शिल्लक स्टॉलची संख्या विचारात घेता स्टॉल नोंदणी करीता त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक हिंदुराव चव्हाण यांनीक केले आहे.