तिरोडा प.स.चे माजी सभापती सोनवाणे यांचे निधन

0
8

गोंदिया,दि.20ः- तिरोडा पंचायत समितीचे माजी सभापती व भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ते प्रभुराज सोनेवाने ( बंडुभाऊ ) यांचे दि.१९ डिसेंबरला रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर आज पैतृक गाव सेजगाव (एकोडी) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या मागे पत्नी,मुले मुली असा बराच मोठा आप्त परविरा आहे.