निवडणूक यंत्रणेला ई.व्ही.एम.,व्ही.व्हीपॅडचे प्रशिक्षण,जनजागृतीचे आवाहन 

0
8

गोंदिया,दि.24: भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या निवडणूक आदर्शरित्या पार पाडण्यासाठी तसेच मतदानाचा टक्के वाढविण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यासोबतच व्ही.व्ही.पी.टी पॅड व ईव्हीएम मशीनबद्दल असलेला गैरसमज दुर करण्याकरीता जनजागृती मोहीम गावपातळीवर यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे  आज(दि.24)दिे.जिल्हयात निवडणूक पद्धती, निवडणूक कार्यप्रणाली तसेच ई.व्ही.एम., व्ही.व्ही पॅड वापरतांना येणाऱ्या विविध अडचणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित संबंधित यंत्रणेकरीता प्रात्याक्षिकाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते,त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक,निवडणूक उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, उपजिल्हाधिकारी रोहयो सुनिल कोरडे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम 25  ते 27 डिसेंबर 2018 पर्यंत तालुकास्तरावर ठेवण्यात आले असून निवडणुकीत सहभागी होणार्या सर्व संबंधित निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच त्या कर्मचाऱ्यामार्फत निवडणूक जनजागृती कार्यक्रम विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येक मतदान केन्द्रावर जाऊन ई.व्ही.एम., व्ही.व्ही पॅडवर प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरीकांना ई.व्ही.एम., व्ही.व्ही पॅड संबंधी जाणिव व्हावी तसेच मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे प्रयत्न करावे अशा सुचना जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान दिले.
नविन प्रशासकीय इमारतीत ठेवण्यात आलेल्या ई.व्ही.एम., व्ही.व्ही पॅड मशीन विविध लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रांगरुम उघडून जनजागृतीकरीता काढण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.सर्व राजकीय प्रतिनिधींना त्याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार,नायब तहसिलदार,तलाठी व मंडळअधिकारी यांना ई.व्ही.एम., व्ही.व्ही पॅडचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.जिल्हाधिकारी यांनी ई.व्ही.एम., व्ही.व्ही पॅड संदर्भात येणाऱ्या विविध अडचणीच्या माहिती घेत, त्यासंदर्भात उपाय योजना व मशीन हाताडण्याचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. सदर कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून उपविभागीय अधिकारी गंगाधर तलपदे, हरीशचंद्र मडावी, नायब तहसिलदार नोखलाल कटरे, अमित पाथोडे, अमोल गजभिये व निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.