विद्यमान सरकार उद्योगपतीचे एजन्ट आहेत : कटरे

0
12
काँग्रेसचा शेतकरी आक्रोश मोर्चा धडकल तहसील कार्यालयावर
अर्जुनी मोरगाव,दि.28 : सध्याचे केंद्र व महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार, हे शेतकरी विरोधी आहेत. दोन कोटी रोजगार देण्याचे नावावर सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा उडविली आहे. कर्जमाफी देण्यात अजुनही सरकारचा अभ्यासच सुरू आहे. उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून देशातील गोरगरीबांची लूट सुरू आहे. व उद्योगपतीचे घर भरीत आहे. १५ लाख खात्यात टाकणार हे घोषणा हवेतच विरली आहे. धानाला दीड पटीने भाव देण्याचे स्वप्न ही भंगले. महिला सक्षमीकरणाच्या नावाने महिला बचतगटांना वेठीस धरणे सुरू आहे. मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड राज्यातील निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांनी दिलेले सरकार कर्ज माफी व धानाला २५०० रुपये भाव काँग्रेसची सरकार स्थापन होताच आश्वासन पूर्ती दोन तासातच करण्यात आली. त्यामुळे देशातील भाजपा सरकार व महाराष्ट्रातील भाजपा सरकार उलथवून टाकण्याचा निर्धार आपण केला पाहिजे, कारण ही सरकार बेरोजगार, शेतकरी व युवा वर्गाची नसून देशातील उद्योगपतीचे एजन्ट असल्याचे आवाहन गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम बाबा कटरे यांनी केले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने २७ डिसेंबर रोजी आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चात तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर अमर वºहाडे, भागवत नाकाडे, गोंदिया जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, विशाल शेंडे, अशोक लंजे, राजेश नंदागवळी, जि.प. सदस्य गिरीष पालीवाल, आनंदकुमार जांभुळकर, नगराध्यक्ष किशोर शहारे, पोर्णिमा शहारे, आशा झिलपे, प्रमोद लांजेवार, निशांत राऊत, माणिक घनाडे, चंद्रशेखर ठवरे, विजय लाडे, रत्नदीप दहिवले उपस्थित होते. शेतकरी आक्रोश मोर्चाची सुरुवात दुर्गा चौक अर्जुनी मोरगाव येथून करण्यात आली. मोर्चात सरकार विरोधी घोषणा देत हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गानी तहसील कार्यालयावर काढण्यात आला. मोर्चाचे सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी सरकारच्या चुकीच्या धोरणाचा कडाडून विरोध केला व या भेदभावी सरकारला धड शिकविण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत नाकाडे यांनी केले तर संचालन व आभार रत्नदीप दहिवले यांनी मानले.
अन् लोकनेते आलेच नाही
ज्यांचे नेतृत्वातखाली अर्जुनी मोरगाव येथे शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. ते काँग्रेस किसान आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते मोर्चाला आलेच नाही. या मोर्चात नाना पटोले येणार म्हणून हजाराचेवर ग्रामस्त आले होते. मात्र, शेवटपर्यंत नाना पटोले मोर्चात आले नसल्याने मोर्चेकरांचा पूर्णत: हिरमोड झाला तर मंचावरील कार्यकर्त्यांतही उत्साहाचे वातावरण दिसले नाही. मात्र, भाषणे सुरू होण्यापूर्वीच मोर्चेकºयांनी आपली जागा सोडणेच योग्य समजले.