ओबीसीत सहभागासाठी यवतमाळात लोधी समाजाचा एल्गार: लोधी इंजि राजीव ठकरेले

0
25

यवतमाळ,दि.28ः- राज्यामध्ये ओबीसीत असलेल्या लोधी समाजाला केंद्राच्या यादीत स्थान मिळावे यासाठी गेल्या वर्षभरापासून लोधी समाजाच्यावतीने दिल्लीपासून गल्लीपर्यंत आंदोलन सुरु करण्यात आले आहे.याच कळीमध्ये गेल्या आठवड्यात गोंदियात लोधी समाजाने ५ डिसेंबरला मोठी रॅली काढून धरणे आंदोलन केले होते.त्यानंतर 27 डिसेंबरला यवतमाळच्या पोस्टल मैदानावर जिल्ह्यातील लोधी बांधवानी एकत्र येत केंद्राच्या ओबीसी यादीत समाजाला समाविष्ठ करण्यासाठी एल्गार पुकारला.मैदानाव झालेल्या सभेनंतर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, समाजकल्याण मंत्री थावरसिह गहलोत,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींना निवेदन पाठविण्यात आले.या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने महिला पुरुष व मोटर सायकलने सहभागी झाले होते.यवतमाळ शहरात पहिल्यांदाच लोधी समाजाची एकता असलेली भव्य रॅलीने राजकारणासह प्रशासनाचेही लक्ष वेधून घेतले होते.

केंद्राच्या यादीमध्ये समावेश करण्यात न आल्यास येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर समाजाच्यावतीने बहिष्कार करण्यात येणार असल्याची घोषणा समाजाचे युवा नेते आंदोलनाचे प्रमुख लोधी इंजि राजीव ठकरेले यांनी यावेळी केली.महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाचे संख्याबळ आणि एकते बघून नुकत्या फक्त दोन वर्षात मराठा समाजाला १६% आरक्षण दिले.धी समाज मागच्या १६ वर्षापासून आपल्या संविधानिक अधिकारासाठी झटत असल्याने सरकार दुजाभाव करीत असल्याची टिका ही केली.
लोधी समाज हा देशाच्या १८ राज्यात असून १४ राज्यात राज्य व केंद्राच्या ओबीसीच्या सूचीत आहे. दोन राज्यात अनुसूचित जनजातीमध्ये येते. महाराष्ट्राच्या लोधी समाजाला राज्यात ओबीसींचा दर्जा दिला केंद्रात अजून दिलेला नाही.केंद्र सरकारने आम्हाला आमचे संविधानिक अधिकार देऊन आम्हाला केंद्राच्या ओबीसी सूचीत समाविष्ट नाही केले तर येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा बहिष्कार संपूर्ण महाराष्ट्रातील ४८ लाख लोधी बांधव करणार अशी घोषणा केली.

यावेळी समाजाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष लोधी जगलाल बैठवार, सितांशू बॅटवार, गजानन कटारे, दिलीप दमाहे, उदय दमाहे, नारायण ठाकरे, प्रमोद नागपुरे, करमचंद बैठवार, सदानंद कटारे, भगवान बंधाटे, दामोदर बहेटवार, ओम कटारे, संदीप डहारे, विलास लिल्हारे, सुदाम कटारे, यादव दमाहे, राजेंद्र बंधांटे, ईश्वर डहारे, विरेन्द्र रणगीरे, राजेंद्र रणगीरे, मणिश सिवारे, रामप्रसाद शेंडे, सुजल दवारे, महेश नागपुरे, रोशन वाघमारे, विवेक वाघमारे, आकाश दमाहे, निलेश दमाहे,राजू लिल्हारे, बबलू रणगीरे, हरिपाल दवारे, विजय लिल्हारे, योगेश लिल्हारे, नंदू डहारे, कबिर डहारे, मुकेश लिल्हारे, ज्ञानेश्वर डाहरे, मधुकर लिल्हारे, राजू शेंडे, विकास नागपुरे, किशोर नागपुरे, जतन शिवारे, किशोर दवारे ,संदीप नागपुरे (नागपुर), राहुल नागपुरे (नागपुर) श्यामसुंदर नागपुरे (भंडारा), नानेश्वर बिरणवारे (भंडारा), शिवराम सव्वालाखे (गोंदिया) दयाराम तिवडे (गोंदिया), संतोष महाजन (उमरेड), डॉ राम मसुरके (रामटेक), विकास दमाहे (आर्वी वर्धा), रवि जोशी (चंद्रपुर), बाबा डाहरे (गढचिरोली) उपस्थित होते.