ईव्हीएम व व्हीव्हीपॅटसाठी जनजागृती मोहीम आजपासून

0
23

गोंदिया,दि.२८ : पुढील वर्षी होणाèया सार्वत्रिक निवडणुकीकरीता ईव्हीएम व व्हीव्हीपॅटसाठी जनजागृती मोहीम जिल्ह्यातील चारही मतदारसंघामध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत गावातील, शहरातील मुख्य चौक, बाजार, नाका, शासकीय
कार्यालय, सभांची ठिकाणी आदी ठिकाणी फिरत्या वाहन पथकाद्वारे प्रशिक्षण व प्रात्याक्षिक दाखविण्यसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे व त्यानुसार आज (दि.२८) पासून जनजागृती मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिली.
पुढील वर्षी होणाèया सार्वत्रिक निवडणुकीकरीता मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यात ४ विधानसभा मतदारसंघ असून अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आमगाव या चारही मतदारसंघात प्रत्येकी २ फिरते वाहन पथकाद्वारे तसेच जिल्हास्तरावर एक फिरत्या वाहन पथकाद्वारे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. फिरत्या वाहनांमधील पथकाद्वारे ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची प्रात्याक्षिके दाखविण्यात येतील तसेच मतदारांकडून प्रात्याक्षिक मतदार करून मतदान घेण्यात येणार आहे.तसेच सर्वांसमोर ईव्हीएममधील मतांची नोंदणी व व्हीव्हीपॅट मशिनमधील चिठ्ठ्यांची मोजणी यांचा ताळमेळ करून दाखविण्यात येणार आहे. याकरीता गोंदिया जिल्ह्यातील गावांतील, शहरातील मुख्य चौक, बाजाराचे ठिकाण, नाका, शासकीय कार्यालय, सभांची ठिकाणे, महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदी ठिकाणी फिरत्या वाहन पथकाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. अर्जुनी मोरगाव – ६३ मतदारसंघात ३१६ मतदान वेंफ्द्रासाठी नियुक्त केलेले पथक ९ व वाहनांची संख्या २ राहणार आहे. तिरोडा – ६४ मतदारसंघात २९५ मतदान वेंफ्द्रांसाठी नियुक्त केलेल्या पथकांची संख्या ९ व वाहनांची संख्या २, गोंदिया – ६५ मतदारसंघात ३६० मतदान वेंफ्द्रांसाठी नियुक्त केलेल्या पथकांची संख्या ३ व वाहनांची संख्या २ तर देवरी – ६६ मतदारसंघात ३१० मतदान वेंफ्द्रांसाठी नियुक्त केलेल्या पथकांची संख्या ६ व वाहनांची संख्या २ , जिल्हा कार्यालय वाहन संख्या १ असे एवूफ्ण १२८१ मतदान वेंफ्द्रांवर २७ पथकांची नियुक्ती केली असून ९ वाहन १ ते २८ दिवस जनजागृती करणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत आपल्या शंका असल्यास त्यांचे निरासन करून घ्यावे, असे आवाहनही आयोजित पत्रपरिषदेत डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. आयोजित पत्रपरिषदेत उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे,सुनील कोरडे उपस्थित होते.