चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार पतीपत्नी ठार

0
12

तिरोडा,दि.30ःः गोंदिया-तिरोडा राज्यमार्गावरील तिरोडा नजीक असलेल्या अदानी पाॅवर प्रोजेक्टच्या गेट नंबर 3 समोर आज सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे पतीपत्नी ठार झाल्याची घटना घडली.या मृतामध्ये टेकचन्द पटले व प्रमिला टेकचंद पटले(रा.जमुनिया) यांचा समावेश आहे.तुमसरकडून गोंदियाकडे येत असलेल्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच 36,झेड 5050 च्या समोर अचानक दुचाकीस्वार आल्याने व आधीच वेगात असलेल्या चारचाकीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी वाहनाला धडक दिली.ही धडक एवढी मोठी होती की चारचाकी वाहनाने सुध्दा पलटी खाली. चारचाकीमध्ये तुमसर येथील लायन मेंबर एड.मनिष रावलानी व त्यांचे काही सदस्य या वाहनात होेते.त्यांना मात्र काही झाले नसून ते सुरक्षित असल्याचे वृत्त आहे.