राशन दुकान बंद करण्याचे शासनाचे षडयंत्र : चंद्रिकापुरे

0
15

अर्जुनी मोरगाव,दि.05 : सर्व सामान्य गरिब जनतेला स्वस्त दरात राशन उपलब्ध करून देणे शासनाचे कर्तव्य आहे. परंतु, विद्यमान केंद्र व राज्य शासनाने देशपातळीवरील ही याेजना आधार लिंकच्या बडगा उगारून बंद करण्याचे षडयंत्र राबवित आहे. सर्वसामान्य गरीब जनतेसोबत राशन दुकानदारांवर कुर्हाड उगारत आहे. शासनाने लिंकिगसाठी ३१
डिसेंबर २०१८ ही अंतिम तारीख दिली होती.त्यात बदल करावा, अन्यथ तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काॅग्रेंसचे प्रदेश प्रतिनिधी व किसान सभेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष
मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिला आहे.
चंद्रिकापुरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र व राज्य शासनाचा वाटा असलेल्या या योजनेतंर्गत गरीबांना गहू, तांदुळ, साखर, तूर डाळ, तेल इतर कडधान्य केरोसीन हे सरकारी स्वस्त धान्य दुकानादारामार्फेत वाटप  केले जाते परंतु  सध्या वाटपातील कोटा अत्यल्प केला आहे. साखर फक्त प्रती कार्ड अर्धा किलो वितरीत करणे म्हणजे गरीबांची थट्टा आहे. पामोलीन तेल सणासुदाच्या वेळी मिळत नाही.केरोसीनचा कोटा अत्यल्प असल्याने जनतेसोबत दुकानदारामध्ये र्तीव असंतोषांची लाट निर्माण झाली आहे. केशरी राशन कार्ड
फक्त शोभेची वस्तू बनली असून तिचा उपयोग फक्त तहसिल कार्यालयातू दाखले काढण्यासाठीच केला जातो. नुकतेच डीबीटी प्रणालिच्या विरोधात दिल्ली येथे देशव्यापी आंदाेलन दुकानदारानी केले होते. त्यामध्ये लाखाेच्या संख्ये देशातील रेशन दुकानदारांनी उपस्थिती दर्शविली होती.त्यानंतर महाराष्टामध्ये जिल्हा व तालुकास्तरावर आंदोलन सुध्दा केले. परंतु, सरकारला अद्यापही जाग आली नाही. सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांवर सध्या ऑनलाईन आधार लिकिंगचा बडगा शासनाने उगारला असून पुरवठा अधिकाNयांकडून वारंवार बैठक घेऊन दुकानदारांना तंबी दिल्या जाते. स्थानिक गाेरगरिब लोक रोजगारासाठी  दुर गेले आहेत. त्यांना आधार लिंकिंगसाठी गावी येणे अत्यावश्यक केले आहे. परंतु, लिंक फेल, ठसे जुळत नाही अशा अनेक समस्यांनी ग्राहक व दुकानदार त्रस्त असून त्यांचे म्हणणे ऐकूण घ्यायला शासन तयार नाही. शासनाने आधार लिकींगची डेडलाईन ३१ डिसेंबर २०१८ दिली होती. परंतु विहीत कालावधीत संपूर्ण लिकिंग झाली  नसल्याने सामान्य जनता व राशन दुकानदारासमाेर माेठा पेच पडला आहे.एंकदरित शासनाच्या अधिनस्थ तहसील कार्यालयातील कर्मचारी राशन दुकानदारांना लिंकिगच्या नावावर त्रस्त करित असल्याने स्वस्त धान्य दुकानदार व नागरिकांनी गर्हाणे कुणाकडे मांडावी असा प्रश्न उपस्थित करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.